रवी राणांनी नवनीत राणांना खासदार होऊ दिले नाही:त्यांनी भाजपच्या सर्व लोकांशी वाद घातला, विधानसभेला काय होते पहा- बच्चू कडू

नवनीत राणा यांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिले नाही. नवनीत राणा या खासदार होऊ नये, याला रवी राणा हेच जबाबदार आहेत. एखाद्याला निवडणूक लढायची असते तेव्हा सगळ्यांना समजून घ्यायला हवे, असे म्हणत माजी मंत्री बच्चू कडू यांनी राणांना टोला लगावला आहे. बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, रवी राणा यांनी अमरावतीमधील भाजपच्या सर्वच नेत्यांशी वैर घेतले होते. त्यांच्याशी वाद घातला होता. त्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाला. आता विधानसभेला काय होते ते बघा, असा इशाराही कडू यांनी दिला आहे. भाजपने मराठा-ओबीसी वाद लावला बच्चू कडू म्हणाले की, ओबीसी मराठा वाद जाणीवपूर्वक लावला गेला आहे. भाजजपने भाजपनेच मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावला ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. गरज सरो वैद्य मरो ही भाजपची भूमिका कायम राहिलेली आहे. भाजप सगळ्यांसोबत अशीच वागली आहे, असे अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटले आहे. सरकार स्थापनेचा प्रयत्न करू बच्चू कडू म्हणाले की, सामान्य माणसाला आपले वाटेल असे सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आम्ही चांगले उमेदवार देणार आहोत. पवारसाहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसले परिवर्तन आणणार आहात? तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसे काय परिवर्तन तुम्ही आणणार आहात? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. बजेटमध्ये सामान्य माणसाचा हिस्सा असणार बच्चू कडू म्हणाले की, परिवर्तनाचा अधिकार महायुतीलाही नाही आणि महाविकास आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला आहे. नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थाने कामाचे असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असेल, असे बच्चू कडू म्हणाले.

  

Share