पुनर्वसन:25 वर्षांपासून भटकणाऱ्या 38 हजार ब्रू आदिवासींना वसवले, केंद्रीय गृहमंत्र्यांचा त्रिपुरा दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी त्रिपुराच्या बुरहा पारा गावचा दौरा केला. तेथे त्यांनी ब्रू आदिवासी लोकांशी चर्चा केली. या दरम्यान त्यांनी सांगितले की, मी तुमच्याहून जास्त आनंदी आहे. तुमचे ४० वर्षांनंतर पुनर्वसन करू शकलो, याबद्दल पंतप्रधान मोदीही आनंदी आहेत. शाह म्हणाले, केंद्र आणि त्रिपुरा सरकार मिळून ब्रू कुटुंबाच्या पुनर्वसनाचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. यामुळे ते आपल्या घरी सन्मानाने राहू शकतील. शाह म्हणाले, आम्ही तुमच्यासाठी २५ प्रकारच्या उपजिविकेच्या संधी उपलब्ध करून दिल्या. शाह यांनी गावाला भेट देऊन लोकांना त्यांची स्थिती आणि सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. एका ठिकाणी काही रहिवाशांनी त्यांना सांगितले की, त्यांना अद्याप आयुष्मान कार्ड मिळाले नाही. त्यावर दोन दिवसांत देऊ,असे आश्वासन दिले. हिंसेनंतर मिझोरामला गेले होते ब्रू १९९७, १९९८ आणि २००९ मध्ये मिझोराममध्ये ब्रू आणि मिझो समुदायातील हिंसेमुळे मिझोरामच्या ममित, लुंगलेई व कोलासीब जिल्ह्यांतून ब्रू आदिवासीचे लोक त्रिपुराच्या उत्तर जिल्ह्यांत आश्रय घेण्यासाठी आले. ब्रू आदिवासींच्या स्थायी पुनर्वसनासाठी १६ जानेवारी २०२० रोजी एक महत्त्वाचा चार-पक्षीय करार झाला होता. या करारानंतर १२ ठिकाणी पुनर्वसनासाठी ७५४ एकर जमीनीचे अधिग्रहण केले. त्यांची एकूण लोकसंख्या ३७,५८४ आहे. आंबेडकर वाद : देशभरात काँग्रेसची पत्रकार परिषद, उद्या मोर्चा काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे काँग्रेस खासदार आणि सीडब्ल्यूसी सदस्य सोमवारी देशभरातील १५० वेगवेगळ्या शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.त्याचबरोबर काँग्रेसतर्फे २४ डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर सन्मान मार्च काढून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार आहे.