समाजसेवेला आयुष्य वाहिलेल्या प्रमिलाताई मेढे यांचे निधन:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिल्या श्रद्धांजली, एम्स रुग्णालयात देहदान केले जाणार समाजसेवेला आयुष्य वाहिलेल्या प्रमिलाताई मेढे यांचे निधन:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिल्या श्रद्धांजली, एम्स रुग्णालयात देहदान केले जाणार

समाजसेवेला आयुष्य वाहिलेल्या प्रमिलाताई मेढे यांचे निधन:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिल्या श्रद्धांजली, एम्स रुग्णालयात देहदान केले जाणार

राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे यांचे आज, गुरुवारी सकाळी नागपूरच्या धंतोली येथील अहिल्या मंदिरात निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 97 वर्षे होते. मागील तीन महिन्यांपासून त्या आजारी होत्या, आणि गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवार) सकाळी ८ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक संवेदना राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका राहिलेल्या प्रमिलाताई मेढे यांच्या देहावसानामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन समाज आणि राष्ट्रसेवेला समर्पित होते. महिला सक्षमीकरणासोबतच सामाजिक कार्यांमधील त्यांच्या अमूल्य योगदानाचे सदैव स्मरण केले जाईल. या शोकाकुल प्रसंगी परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना बळ देवो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. पार्थिव एम्सला देहदानासाठी सुपूर्द केले जाणार राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे यांच्या निधनानंतर आज दिवसभर त्यांचे पार्थिव नागपूरच्या धंतोली येथील अहिल्या देवी मंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या इच्छेनुसार, उद्या (शुक्रवार) सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव एम्सला देहदानासाठी सुपूर्द केले जाणार आहे. प्रमिलाताईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वतः अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्र सेविका समितीच्या वर्तमान प्रमुख शांतक्का यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. प्रमिलाताई सुरुवातीला नागपूरच्या महाल परिसरात वास्तव्यास होत्या. 1965 पासून त्या धंतोलीतील अहिल्या देवी मंदिर परिसरात स्थायिक झाल्या होत्या.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *