नैनितालपेक्षा संभाजीनगरात जास्त थंडी:उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यामुळे पुढील तीन दिवस आणखी वाढणार गारठा

राज्यात हंगामातील नीचांकी ४ अंश तापमान रविवारी (दि. १५) धुळ्यात नोंदवले असून येथील थंडी दिल्ली (४.९) व चंदीगडच्या (४.९) तुलनेत अधिक होती. छत्रपती संभाजीनगरातही यंदाच्या मोसमातील नीचांकी ८.८ तापमान नोंदवले. नैनिताल (९.५), मसुरी (१०.२) व सिमलापेक्षाही (१२.२) येथे अधिक थंडी होती. राज्यात रविवारी धुळे, परभणी, अहिल्यानगर, अकाेला, अमरावती, जळगाव, संभाजीनगरसह ७ शहरांत हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने रविवारचा सुटीचा दिवस सर्वाधिक हुडहुडी भरवणारा ठरला. अफगाणिस्तानाकडून पाकिस्तानमार्गे भारतात येत असलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील काही भागांत जोरदार हिमवृष्टी होत आहे. तसेच उत्तरेकडून ताशी १५ ते १६ किलोमीटर वेगाने थंड वारे वाहत असल्याने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशासह महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. मध्य प्रदेशाला लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मात्र थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. राज्यात प्रमुख शहरांतील किमान तापमान गहू, हरभऱ्यासाठी पोषक थंडीचा कडाका वाढल्याने गहू आणि हरभरा पिकासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. थंडीमुळे पिकांची वाढ होऊन चांगला उतारा मिळू शकेल.
चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात पुढील ३ दिवस थंडीचा कडाका दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. उत्तरेतून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कायम राहणार असल्याने राज्यात पुढील तीन दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. – रामचंद्र साबळे, हवामान शास्त्रज्ञ.

​​​​​​​

  

Share