संभाजीनगरचा ‘जवाहर’ नेहरूंच्या पणतूंना भेटला:वडील प्रतीक पाटील म्हणाले- राहुल गांधींनी अहिंसा, हिंदुत्वाबद्दल मार्गदर्शन केले संभाजीनगरचा ‘जवाहर’ नेहरूंच्या पणतूंना भेटला:वडील प्रतीक पाटील म्हणाले- राहुल गांधींनी अहिंसा, हिंदुत्वाबद्दल मार्गदर्शन केले

संभाजीनगरचा ‘जवाहर’ नेहरूंच्या पणतूंना भेटला:वडील प्रतीक पाटील म्हणाले- राहुल गांधींनी अहिंसा, हिंदुत्वाबद्दल मार्गदर्शन केले

छत्रपती संभाजीनगरमधील बाल ‘जवाहर’ नुकताच चाचा नेहरूंचे पणतू राहुल गांधी यांना भेटून आला. जेमतेम दोन वर्षांच्या या चिमुरड्याच्या भेटीचा किस्सा जाणून घेण्यासाठी दिव्य मराठी डिजिटल संभाजीनगरातील त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी जवाहरचे वडील प्रतीक पाटील यांनी ही भेट जुळून येण्याचा किस्सा तसेच राहुल गांधींसोबतच्या भेटीचा अनुभव सांगितला. नेहरू विचारांनी प्रेरित- मुलाचे नाव ‘जवाहर’ ठेवले छत्रपती संभाजीनगरात राहणारे प्रतीक पाटील हे नेहरू विचारांनी भारावलेले असून, यातूनच त्यांनी त्यांच्या मुलाचे नावही जवाहर असे ठेवण्याचा निर्णय घेतला. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींसोबत भेट झाल्यावर त्यांनी याबद्दल त्यांना सांगितले. तेव्हा राहुल गांधींनी प्रतीक यांचा संपर्क क्रमांक त्यांच्या टीमकडे लिहून घेतला. यानंतर लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या. काही महिन्यांपूर्वीच प्रतीक पाटील यांनी राहुल यांच्या कार्यालयाशी मेलवरून संपर्क केला. यानंतर राहुल यांच्या कार्यालयाकडून त्यांना प्रतिसाद मिळाला व 19 जुलै रोजी त्यांना सहकुटुंब दिल्लीला येण्याचे निमंत्रण मिळाले. ‘जवाहर भवन’मध्येच भेट निमंत्रणावरून दिल्लीला पोहोचल्यावर ‘जवाहर भवन’मध्ये राहुल गांधींसोबत जवाहर व त्याच्या आई-वडिलांची भेट झाली. याविषयी प्रतीक पाटील सांगतात, ‘ही भेट केवळ एक औपचारिक भेट नव्हती, तर ती एका वैचारिक, कृतीशील आणि प्रेरणेची नवी अनुभूती देणारी ठरली. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या संवादात “सेल्फ म्हणजे नेमकं काय.?” या प्रश्नापासून सुरुवात झाली. त्यातून पुढे बुद्ध, महादेव, जोतीराव फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गांधी, नेहरू आणि आजच्या राजकीय घडामोडींपर्यंत विविध विषयांवर मोकळेपणाने चर्चा झाली. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी या सत्रात फक्त चर्चा न करता कृतीतून आपली भूमिका मांडली. त्यांनी स्वतः मॅटवर उतरून जिजित्सू या मार्शल आर्टच्या माध्यमातून आत्मसंरक्षणाचे धडे दिले. त्यांनी आपल्या विपश्यना साधनेचा अनुभव उलगडून दाखवला.’ “ही केवळ चर्चा नव्हती, तर ती प्रेरणा, विचार आणि क्रियाशीलतेचा संगम होता. माझ्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातील ती अविस्मरणीय चार तासांची भेट ठरली.” असे प्रतीक पाटील म्हणाले. नव्या पिढीशी थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने राहुल गांधींनी आयोजित केलेल्या या सत्रात औपचारिकतेऐवजी माणूस म्हणून संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि तो सर्वार्थाने यशस्वी ठरल्याचे प्रतीक पाटील सांगतात. “जवाहर” म्हणजे “रत्न” किंवा “माणिक” “जवाहर” या नावाचा अर्थ “रत्न” किंवा “माणिक” असा होतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावामुळे हे नाव खूप प्रसिद्ध झाले. त्यांच्या वडिलांनी, मोतीलाल नेहरू यांनी, त्यांचे नाव ‘जवाहर’ ठेवले, कारण त्यांना त्यांच्या मुलाकडून खूप अपेक्षा होत्या. ही बातमीही वाचा मी भारताचा पीएमः एका पत्राने भारताचे पहिले PM बनले नेहरू:काँग्रेसच्या 80% समित्या पटेलांच्या बाजूने होत्या, मात्र गांधीजी नव्हते तयार स्वतंत्र भारतात पंतप्रधानपद हे सर्वात शक्तिशाली आणि प्रतिष्ठेचे पद आहे. गेल्या 77 वर्षात अनेकांनी पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहिले होते, मात्र आजपर्यंत केवळ 14 व्यक्तींनाच त्यावर बसण्याची संधी मिळाली आहे. काहींना जनतेचा उदंड पाठिंबा मिळाला, तर काहींना यासाठी राजकीय डावपेच खेळावे लागले. दिव्य मराठीच्या ‘मी भारताचा पीएम’ या विशेष मालिकेतील या पंतप्रधानांच्या कहाण्या. आज पहिल्या एपिसोडमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांची कहाणी… वाचा पूर्ण बातमी

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *