अमरावती जिल्ह्यातील तरुणाचा पाकिस्तानमधील संघटनांशी संबंध:सलग तिसऱ्या दिवशी चौकशी; NIA ची टीम तळ ठोकून

शहरातील छायानगर परिसरातील ‎‎रहिवासी मो. मुसैब शे. ईसा (23)‎याला ‘एनआयए’ने संशयाच्या‎ आधारे 12 डिसेंबरला ताब्यात घेतले‎ होते. 15 तासांच्या चौकशीअंती ‎‎सायंकाळी सोडले होते. त्याचप्रमाणे ‎‎शुक्रवारी सकाळी पुन्हा साडेनऊ ‎‎वाजतापासून चौकशी सुरू करून ‎रात्री साडेनऊ नंतर त्याला सोडून ‎दिले. तसेच शनिवारी (दि.14)‎सकाळी चौकशीसाठी बोलावले ‎आहे. या तरुणाचा पाकिस्तानातील संघटनांशी संबंध असल्याचा NIA ला संशय आहे. त्यामुळे NIA चे पथक गेल्या तिन दिवसांपासून अमरावतीमध्ये तळ ठोकून आहे. शुक्रवारी सकाळी मो. मुसैबला ‎‎त्याच्या वडिलांनी स्वत: राजापेठ ‎ठाण्यात सायकल रिक्षात बसवून ‎आणले व ‘एनआयए’कडे‎ चौकशीसाठी हजर केले. या वेळी ‎‎मुसैबचे मामा सोबत होते. त्यानंतर ‎‎‘एनआयए’ने मुसैबवर असलेल्या ‎‎संशयाच्या आधारे सखोल‎ चौकशी सत्र सुरू केले. शुक्रवारी ‎‎रात्रीपर्यंत ‘एनआयए’ निश्चितच ‎‎निष्कर्षाप्रत पोहोचणार, अशी चर्चा ‎सुरू होती. परंतु शुक्रवारी रात्री ‎साडेनऊ वाजेपर्यंत चौकशी करून‎ त्याला सोडण्यात आले. मो. मुसैब‎ हा एका दहशतवादी संघटनेसोबत‎ जोडला गेला असावा किंवा त्यांच्यासोबत‎ सोशल मीडिया ग्रुपवर तो सहभागी‎ असावा, असा संशय ‘एनआयए’ला ‎आहे. त्याच संशयातून ही चौकशी‎ सुरू आहे.‎ अनेक महिने पैसे जमा ‎करून घेतला मोबाइल‎ मो. मुसैबची घरची परिस्थिती‎ हलाखीची आहे. तो अत्तर विक्री‎ करतो. त्यामधूनही त्याला फार पैसे ‎मिळत नाही. दरम्यान त्याला स्मार्ट‎फोन घ्यायचा होता, त्यासाठी त्याने‎ अनेक महिने इतरांना थोडे, थोडे‎पैसे मागितले. अशा पद्धतीने जमा ‎झालेल्या रकमेतून त्याने मोबाइल ‎खरेदी केला असल्याचे मुसैबच्या‎ मामाने सांगितले.‎ गुरुवारी रात्री कोणासोबतच ‎मोकळा बोलला नाही‎ गुरुवारी सायंकाळी ‘एनआयए’ने‎ चौकशी करून मो. मुसैबला घरी‎ सोडले. गुरुवारच्या रात्री तो घरीही ‎कोणासोबतच चौकशीच्या विषयावर‎ काहीच बोलला नाही. त्याच्या सोबत ‎आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र ‎तो बोलत नव्हता, असे मौ. मुसैबचे‎ वडील शे. ईसा यांनी सांगितले आहे.

  

Share