सरपंच हत्या प्रकरण दाबायच्या भानगडीत पडू नका:राज्यातील शांतता भंग झाल्यास मुख्यमंत्री जबाबदार – मनोज जरांगे

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली. सरपंचांच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मस्साजोग गाव गाठत कुटुंबियांशी संवाद साधला. हे प्रकरण दाबण्याच्या भानगडीत पडू नका. या प्रकरणात जातीचे लोक पाठीशी घालू नका, असे मनोज जरांगे म्हणाले. सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. या प्रकरणाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. मस्साजोग गावाचे सरपंच यांची सोमवारी हत्या झाल्यानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांकडून अहिल्यानगर-अहमदपूर मार्गावर मंगळवारी सकाळपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून हटवताना पोलिस आणि ग्रामस्थ आमने सामने आले होते. त्यानंतर संतप्त जमावाने एसटी बस पेटवून दिली. या दरम्यान मनोज जरांगे मस्साजोग गावात दाखल झाले होते. त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. मराठ्यांच्या भावनेशी खेळत जाऊ नका
न्याय पाहिजे म्हणून लोक रस्त्यावर बसले आहेत, तो रास्ता रोको नाही. या लोकांना न्याय देणार नसाल तर सरकारने विचार करणे गरजेचे आहे. आरोपीला जात नसते हे लक्षात ठेवावे. आरोपींना पाठिशी घालू नका. समाजाचा संयम सुटला तर तुम्हाला जड जाईल. मराठ्यांच्या भावनेशी खेळत जाऊ नका. आरोपींना अटक करा, त्यांना फाशीची शिक्षा द्या. हे प्रकरण जातीत तोलू नका, असे मनोज जरांगे म्हणाले. …तर मुख्यमंत्री जबाबदार राहतील
मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील शांतता भंग झाली तर याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. आमचे लेकरु मारुन टाकण्यात आले. ते आरोपी मोकाट असतील. एफआयआर म्हणण्याप्रमाणे लिहून घेत नसाल, तर पोलिस अधिकारी निलंबित करा, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली. जातीचे लोक पाठीशी घालू नका
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, ही लोकं न्याय मागत आहेत, रास्ता रोको असता तर धिंगाणा झाला असता. गावचे लेकरु मारुन टाकले आहे. सीआयडी चौकशी करा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करु नका, जिल्ह्यातील छाती बडवणाऱ्या नेत्यांना निक्षून सांगतो याला रास्ता रोको समजू नका, जातीत तोलू नका, जातीचे लोक पाठिशी घालू नका. त्यांना आत टाका, अशी मागणी मनोज जरांगे यांनी यावेळी केली. हे ही वाचा… केज येथील रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण:संतप्त जमावाने एसटी बस पेटवली, मनोज जरांगे यांनी कुटुंबीयांची घेतली भेट मस्साजोग गावाचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांची सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी केज येथे अहिल्यानगर-अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. मागील नऊ तासांपासून हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास या रास्ता आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने एसटी महामंडळाची बस पेटवून दिली. सविस्तर वाचा…

  

Share