सतीश भोसलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची धमकी?:हरीण आमचे दैवत, त्यांची शिकार करणारा माफीलायक नाही; फेसबुक पोस्ट व्हायरल

सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. एका फेसबुक अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली असून ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ‘खोक्या’ला लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी करत अटक न केल्यास मी त्याला शिक्षा देईन, अशी धमकी या फेसबुक पोस्ट करण्यात आली आहे. सतीश भोसले याचे नवनवीन कारनामे सध्या समोर येत आहेत. शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. पोलिस आणि वन विभागाच्या पथकाने आज त्याच्या घराची झाडाझडती घेतली. या कारवाईत त्याच्या घरात वन प्राण्यांचे मांस आणि शिकारीसाठी वापरले जाणारे हत्यारे सापडले. या दरम्यान आता अज्ञात व्यक्तीकडून लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सतीश देशमुख याला धमकी देण्यात आली आहे. फेसबुक पोस्टमध्ये नेमके काय म्हटले? अज्ञात व्यक्तीकडून दोन दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने एक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले. याच फेसबुक अकाउंटवरून सतीश भोसले याला धमकी देण्यात आली, या फेसबुक पोस्टमध्ये ‘बीड पोलिसांना मी विनंती करतो. लोकप्रतिनिधी सुरेश धस यांचा समर्थक सतीश भोसले याला लवकरात लवकर अटक करा. मी त्याला शिक्षा देईनच पण त्याला तुम्ही आधी तुरुंगात टाका. हरीण, काळवीट हे आमचं दैवत आहे. त्यांची शिकार करणाऱ्याला, त्यांची तस्करी करणारा माफीलायक नाही. तुम्ही त्याला ताब्यात घ्या’ असे लिहिलेले आहे. अकाउंट बनावट असल्याचा संशय लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजातला असून तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय आहे. तसेच त्याची गँग देखील आहे. बिश्नोई समाजात हरीण, काळवीट आदी प्राण्यांना फार महत्त्व असते. काळवीट प्रकरणावरुन लॉरेन्सने अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सध्याच्या व्हायरल फेसबुक पोस्टमुळे आता सतीश भोसले प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोईची एन्ट्री झाल्याचे लोक म्हणत आहेत. परंतु, या फेसबुक अकाउंटची सत्यता समोर आली नसल्याने ते अकाउंट बनावट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे ही वाचा… सतीश भोसलेचा आणखी एक कारनामा:वन विभागाचा घरावर छापा; सापळे, धारदार शस्त्रे, जाळी, वाघूरसह आक्षेपार्ह साहित्य जप्त बीड मधील भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्या घराची वन विभागाच्या वतीने झाडाझडती घेण्यात आली असून त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात प्राण्यांना पकडण्यासाठी लावण्यात येणारे सापळे तसेच शिकार केल्यानंतर मास खाण्यासाठी लागणारे साहित्य हाती लागले आहे. त्यामुळे आता सतीश भोसले हा हरणांना पकडून त्यांची शिकार करून त्यांचे मास खात होता, हा आरोप सिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूर्ण बातमी वाचा… ‘खोक्या’वर 200 काळविटांच्या ‎शिकारीचा आरोप; अवशेष जप्त:वन विभागाकडून शिरूरमध्ये पाच ठिकाणी पंचनामा‎ भाजपच्या भटके विमुक्त युवा आघाडीचा प्रदेश‎उपाध्यक्ष व मारहाण प्रकरणातील संशयित ‎‎सतीश भोसले ऊर्फ‎‎खोक्यावर २०० हरीण,‎‎काळविटाच्या शिकारीचा‎‎आरोप आहे. यासंदर्भात‎‎पाडळी येथील माउली‎‎शिरसाट यांनी आरोप‎‎केल्यानंतर वन विभागाच्या‎‎१२ कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी‎‎शिरूर तालुक्यात पाच‎ठिकाणी पंचनामे केले. या पाचही ठिकाणी‎हरणांची शिकार झाल्याचा संशय आहे. एका‎ठिकाणी मृत हरणाचे अवशेष आढळले असून‎ते फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले‎जाणार आहेत, अशी माहिती आरएफओ‎देवगुंडे यांनी दिली आहे.‎ पूर्ण बातमी वाचा…

  

Share