शक्तिपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गांना स्थगिती:शेतकऱ्यांच्या विरोधासमोर झुकले सरकार

स्थानिक शेतकऱ्यांच्या भूसंपादनाला विरोधानांतर शक्तिपीठ महामार्गासोबतच भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक महामार्गाचे काम स्थगित झाले आहे. नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग होणार होता, तर पुणे ते नाशिक असा औद्योगिक महामार्ग आणि सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्तीपीठ महामार्ग होणार होता. या तिन्ही महामार्गांच्या कामासाठी जवळपास सव्वालाख कोटी रुपयांची गुंतवणूक होती. मात्र आता शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे या कामांना ब्रेक लागला आहे. शेतकऱ्यांपूढे सरकारला माघार घ्यावी लागली महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या तिन्ही महामार्गांना ओळखले जाते. राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यात या महामार्गांची महत्त्वाची भूमिका राहिली असती. शक्तिपीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्याची योजना होती, मात्र शेतकऱ्यांनी भूसंपादनाला केलेल्या विरोधानांतर एसएसआरडीसीने भूसंपादन थांबवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपूढे सरकारला माघार घ्यावी लागली असल्याचे दिसते. शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध एमएसआरडीसीने पुणे ते नाशिक असा अतिवेगवान प्रवासासाठी औद्योगिक महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला होता. 213 किमी लांबीच्या या महामार्गामुळे पुणे ते नाशिक केवळ 2 तासांचे अंतर होणे अपेक्षित होते. यासाठी भूसंपादन देखील सुरू करण्यात आले होते. तीर्थक्षेत्र असलेल्या शेगावला समृद्धी महामार्गावरून जाता यावे यासाठी सिंदखेद राजा ते शेगावदरम्यान समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 109 किमी लांबीचा हा भक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. तर नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला सांगली आणि कोल्हापूर येथील शेतकरी व ग्रामस्थांनी विरोध केला तसेच हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सरकारकडे कोणता पर्याय? या तिन्ही महामार्गांना शेतकरी व ग्रामस्थांकडून विरोध झाल्याने या प्रकल्पासाठी सुरू असलेले भूसंपादन थांबवण्यात आले आहे. महामार्गांच्या संरेखनात बदल करत विरोध असेलेली ठिकाणे टाळून हा प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी एमएसआरडीसीने ठेवली आहे. मात्र, आता पुढील कार्यवाही राज्य सरकारच्या निर्णयानंतरच होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

​स्थानिक शेतकऱ्यांच्या भूसंपादनाला विरोधानांतर शक्तिपीठ महामार्गासोबतच भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक महामार्गाचे काम स्थगित झाले आहे. नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग होणार होता, तर पुणे ते नाशिक असा औद्योगिक महामार्ग आणि सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्तीपीठ महामार्ग होणार होता. या तिन्ही महामार्गांच्या कामासाठी जवळपास सव्वालाख कोटी रुपयांची गुंतवणूक होती. मात्र आता शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे या कामांना ब्रेक लागला आहे. शेतकऱ्यांपूढे सरकारला माघार घ्यावी लागली महायुती सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या तिन्ही महामार्गांना ओळखले जाते. राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यात या महामार्गांची महत्त्वाची भूमिका राहिली असती. शक्तिपीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्याची योजना होती, मात्र शेतकऱ्यांनी भूसंपादनाला केलेल्या विरोधानांतर एसएसआरडीसीने भूसंपादन थांबवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपूढे सरकारला माघार घ्यावी लागली असल्याचे दिसते. शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध एमएसआरडीसीने पुणे ते नाशिक असा अतिवेगवान प्रवासासाठी औद्योगिक महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला होता. 213 किमी लांबीच्या या महामार्गामुळे पुणे ते नाशिक केवळ 2 तासांचे अंतर होणे अपेक्षित होते. यासाठी भूसंपादन देखील सुरू करण्यात आले होते. तीर्थक्षेत्र असलेल्या शेगावला समृद्धी महामार्गावरून जाता यावे यासाठी सिंदखेद राजा ते शेगावदरम्यान समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 109 किमी लांबीचा हा भक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. तर नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला सांगली आणि कोल्हापूर येथील शेतकरी व ग्रामस्थांनी विरोध केला तसेच हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सरकारकडे कोणता पर्याय? या तिन्ही महामार्गांना शेतकरी व ग्रामस्थांकडून विरोध झाल्याने या प्रकल्पासाठी सुरू असलेले भूसंपादन थांबवण्यात आले आहे. महामार्गांच्या संरेखनात बदल करत विरोध असेलेली ठिकाणे टाळून हा प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी एमएसआरडीसीने ठेवली आहे. मात्र, आता पुढील कार्यवाही राज्य सरकारच्या निर्णयानंतरच होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

Share