शरद पवारांच्या स्वागताला अजित पवारांची लगबग:जय पवारांच्या साखरपुड्याचे PHOTO; सुप्रिया सुळे म्हणाल्या, पवारांच्या घरात आणखी एक ‘लेक’ आली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा झाला. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा येथील फार्म हाऊसवर हा कार्यक्रम झाला. या साखरपुड्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटी नंतर प्रथमच सर्व पवार कुटुंब मनातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले होते. विशेष म्हणजे शरद पवार यांचे स्वागत करण्यासाठी अजित पवार हे स्वत: गेटपर्यंत गेले होते. या साखरपुड्याचे फोटो आता व्हायरल होत आहेत. या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी ऋतुजा यांच्या रुपाने पवार कुटुंबात आणखी लेक आली असल्याचे म्हटले आहे. पवार कुटुंब लेक आणि सुन यांच्यात फरक करत नाही. त्यामुळे आम्ही ऋतुजाचे स्वागत केले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.