शरद पवार नात, जावयासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला:अनेक वर्षांनंतर दुसऱ्यांदा घेतले दर्शन, यापूर्वी CM असताना आले होते

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आपले जावई व नातीसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते त्यांच्या चरणी लीन झाले हे विशेष. राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या भक्तीरसात आकंठ बुडालेत. मुंबईतही विविध गणेश मंडळांच्या गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे. विशेषतः लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली आहे. त्यातच शरद पवार सोमवारी सकाळी आपले जावई सदानंद सुळे व नात रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरद पवारांनी लालबागच्या राजाकडे कोणते साकडे घातले असेल? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पवार बऱ्याच वर्षांनी लालबागच्या राजाच्या चरणी लीन शरद पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. कोरोना महामारीच्या काळात लालबाग राजाच्या मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवारांनी या शिबिराला भेट दिली होती. पण त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. तेव्हा फक्त रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. चिंचपोकळीच्या चिंतामणीचेही घेतले दर्शन लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर शरद पवारांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनालाही पोहोचले. तिथेही त्यांनी सदानंद सुळे व रेवती सुळे यांच्यासोबत गणपतीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरेंनीही घेतले दर्शन उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारीच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तथा सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत. हे ही वाचा…
सुरतच्या गणेश मंडपावर दगडफेक, 33 जणांना अटक:निषेधार्थ हजारो लोकांची हिंसक निदर्शने; पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या सुरत – सुरतच्या लालगेट भागात गणेश उत्सवादरम्यान रविवारी रात्री उशिरा ६ तरुणांनी मंडपावर दगडफेक केली. याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. दगडफेक करणाऱ्या सहाही जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या 27 जणांनाही अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

​राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आपले जावई व नातीसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते त्यांच्या चरणी लीन झाले हे विशेष. राज्यात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. गणेशभक्त आपल्या बाप्पाच्या भक्तीरसात आकंठ बुडालेत. मुंबईतही विविध गणेश मंडळांच्या गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे. विशेषतः लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली आहे. त्यातच शरद पवार सोमवारी सकाळी आपले जावई सदानंद सुळे व नात रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. लालबागचा राजा हा नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरद पवारांनी लालबागच्या राजाकडे कोणते साकडे घातले असेल? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पवार बऱ्याच वर्षांनी लालबागच्या राजाच्या चरणी लीन शरद पवारांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते सोमवारी लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. कोरोना महामारीच्या काळात लालबाग राजाच्या मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवारांनी या शिबिराला भेट दिली होती. पण त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मंडळातर्फे गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. तेव्हा फक्त रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. चिंचपोकळीच्या चिंतामणीचेही घेतले दर्शन लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर शरद पवारांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनालाही पोहोचले. तिथेही त्यांनी सदानंद सुळे व रेवती सुळे यांच्यासोबत गणपतीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरेंनीही घेतले दर्शन उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारीच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तथा सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत. हे ही वाचा…
सुरतच्या गणेश मंडपावर दगडफेक, 33 जणांना अटक:निषेधार्थ हजारो लोकांची हिंसक निदर्शने; पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या सुरत – सुरतच्या लालगेट भागात गणेश उत्सवादरम्यान रविवारी रात्री उशिरा ६ तरुणांनी मंडपावर दगडफेक केली. याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. दगडफेक करणाऱ्या सहाही जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या 27 जणांनाही अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर  

Share