शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्यावर कंगना म्हणाल्या-:मुस्लीम देशांत कोणीही सुरक्षित नाही, आपण भाग्यवान आहोत की राम राज्यात आहोत

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन आपला देश सोडला आणि भारत गाठला. अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार कंगना रणौत म्हणाल्या की, शेख हसीना भारतात सुरक्षित असल्याने मला अभिमान वाटत आहे. मुस्लिम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही. कंगना रणौतने तिच्या एक्सवर पोस्ट शेअर करताना लिहिले- भारत ही आपल्या आजूबाजूच्या सर्व इस्लामिक प्रजासत्ताकांची मूळ मातृभूमी आहे. बांगलादेशच्या पंतप्रधानांना भारतात सुरक्षित वाटत असल्याचा आम्हाला सन्मान आणि आनंद वाटतो. कंगनांनी पुढे लिहिले – मुस्लिम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही, अगदी मुस्लिमही नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही रामराज्यात राहत आहोत. शेख हसीना यांनी सोमवारी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या विरोधात देशात बराच काळ हिंसक आंदोलने होत होती. त्यांनी देश सोडला आणि सोमवारी लष्करी हेलिकॉप्टरने त्यांना भारतात आणण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, काही काळ भारतात राहिल्यानंतर त्या लंडनला जाऊ शकतात.

Share