शिंदेसेना अन् आमदार संजय गायकवाडांनी माफी मागावी:छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून वर्षा गायकवाड आक्रमक शिंदेसेना अन् आमदार संजय गायकवाडांनी माफी मागावी:छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून वर्षा गायकवाड आक्रमक

शिंदेसेना अन् आमदार संजय गायकवाडांनी माफी मागावी:छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून वर्षा गायकवाड आक्रमक

मराठी अस्मिता आणि मातृभाषेच्या सन्मानासाठी लढणाऱ्या ठाकरे बंधूंच्या भूमिकेला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी भूमिका काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली. मराठी विरोधकांच्या विरोधात एकत्र उभे राहण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपच्या महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्वेषी भूमिकेविरोधात ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेचे काँग्रेस पक्ष स्वागत करतो. माय मराठीच्या अस्मितेसाठी, सन्मानासाठीच्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसेच महाराष्ट्र पहिलीपासून हिंदी सक्तीला सर्वांचाच विरोध आहे. पण भाजप जाणीवपूर्वक हिंदीची सक्ती करत होता. जनतेच्या रेट्यामुळे त्यांना जीआर रद्द करावा लागला आहे. हिंदी, उर्दू, तेलुगू, कन्नड या भाषाही राज्यात शिकवल्या जातात, पण त्याची सक्ती नाही, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. एकनाथ शिंदेंनी आपली लाचाही दाखवली वर्षा गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकेची झोड उठवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा देऊन आपली लाचारी दाखवत महाराष्ट्राचा अपमान केला. शिंदेसेना अन् आमदार गायकवाडांनी माफी मागावी तसेच शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या छत्रपती संभाजीराजेंबाबतच्या वक्तव्यावरही वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज व मराठीचा अपमान केला. शिंदेसेना व एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देखील वर्षा गायकवाड यांनी केली आहे. हे ही वाचा… छत्रपती संभाजीराजेंनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का?:मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदेच्या आमदाराचे संतापजनक व्यक्तव्य ​​​​​​​राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मेळाव्यानंतर प्रतिक्रिया देताना तसेच मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे बोलताना गायकवाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अपमानास्पद शब्द वापरले. छत्रपती संभाजीराजे यांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? असा संतापजनक सवाल संजय गायकवाड यांनी केला. शिवाय बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली. पूर्ण बातमी वाचा… मराठी एकजुटीवर 18 वर्षांनंतर उद्धव-राज एकाच मंचावर:राज म्हणाले- बाळासाहेब जे करू शकले नाहीत, ते फडणवीसांनी केले; उद्धव ठाकरेंकडून एकत्र येण्याचे संकेत राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने निर्णय मागे घेतला. या निर्णयानंतर आता ठाकरे बंधूंचा विजयी झाला.मराठी माणसाच्या या दबावामुळे विजय मिळाल्याचे म्हणत दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच विजयी मेळाव्या निमित्तने 18 वर्षानंतर एका व्यासपीठावर आले. पूर्ण बातमी वाचा…

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *