शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना:​​​​​​​आदित्यच्या डोक्यावर हात ठेवून सांगा, आम्ही 50 खोके घेतले, शहाजी बापूंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

आम्ही शिवसेनेतील सत्ता संघर्षावेळी 50 खोके – बिके काहीही घेतले नाही. उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर असे आरोप करण्यापूर्वी स्वतःचा मुलगा आदित्य ठाकरेच्या डोक्यावर हात ठेवून आम्ही 50 खोके घेतल्याचे जाहीरपणे सांगावे, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित ‘मला काय सांगायचं’ हे नाटक येत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ‘पन्नास खोके एकदम ओके’ या हे नाटक आणले जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शहाजीबापू पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना स्टेजवर उभे करावे आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला 50 खोकी मिळाल्याचा दावा करावा. नाही तर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की, आम्हाला 50 खोकी – बोकी काहीही मिळाली नसल्याचे स्पष्ट करतो. महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकदाचा सोक्षमोक्ष होऊनच जाऊ द्या. ठाकरे, राऊत यांना शिवीगाळ करण्याचा धंदा शहाजीबापू पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यापासून खासदार संजय राऊत व उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना शिव्या घालण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करत नाहीत. त्यांचे राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे अजिबात लक्ष नाही. शेतकरी, शेतमजूर, महिला असे राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामुळे ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. या जळक्या वृत्तींनी हा नाटकाचा केलेला प्रकार आहे. ते पुढे बोलताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे नाटकासारखे प्रकार होत असतात. सध्या येणारी नाटके हा प्रचाराचा भाग आहे. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील नाटक हे त्यांनी केलेल्या कामावर व भविष्यात त्यांना महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी जो वेध घ्यायचा आहे, हे या नाटकातून सांगण्यात येणार आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून येणारे नाटक हे केवळ फेक नेरिटिव्हचा भाग असणार आहे. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होणार नाहीत शहाजीबापू पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे यापुढे मुख्यमंत्री होणार नसल्याचाही दावा केला. आम्हाला एकही जागा नको पण मुख्यमंत्रिपद द्यावे, अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आता पोहोचलेत. त्यांनी कितीही विनवणी केली, तर ते यापुढे मुख्यमंत्री होणार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

​आम्ही शिवसेनेतील सत्ता संघर्षावेळी 50 खोके – बिके काहीही घेतले नाही. उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर असे आरोप करण्यापूर्वी स्वतःचा मुलगा आदित्य ठाकरेच्या डोक्यावर हात ठेवून आम्ही 50 खोके घेतल्याचे जाहीरपणे सांगावे, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित ‘मला काय सांगायचं’ हे नाटक येत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ‘पन्नास खोके एकदम ओके’ या हे नाटक आणले जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शहाजीबापू पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना स्टेजवर उभे करावे आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला 50 खोकी मिळाल्याचा दावा करावा. नाही तर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की, आम्हाला 50 खोकी – बोकी काहीही मिळाली नसल्याचे स्पष्ट करतो. महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकदाचा सोक्षमोक्ष होऊनच जाऊ द्या. ठाकरे, राऊत यांना शिवीगाळ करण्याचा धंदा शहाजीबापू पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यापासून खासदार संजय राऊत व उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना शिव्या घालण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करत नाहीत. त्यांचे राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे अजिबात लक्ष नाही. शेतकरी, शेतमजूर, महिला असे राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामुळे ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. या जळक्या वृत्तींनी हा नाटकाचा केलेला प्रकार आहे. ते पुढे बोलताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे नाटकासारखे प्रकार होत असतात. सध्या येणारी नाटके हा प्रचाराचा भाग आहे. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील नाटक हे त्यांनी केलेल्या कामावर व भविष्यात त्यांना महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी जो वेध घ्यायचा आहे, हे या नाटकातून सांगण्यात येणार आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून येणारे नाटक हे केवळ फेक नेरिटिव्हचा भाग असणार आहे. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होणार नाहीत शहाजीबापू पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे यापुढे मुख्यमंत्री होणार नसल्याचाही दावा केला. आम्हाला एकही जागा नको पण मुख्यमंत्रिपद द्यावे, अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आता पोहोचलेत. त्यांनी कितीही विनवणी केली, तर ते यापुढे मुख्यमंत्री होणार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.  

Share