शिवसेना आणि संघाचे विचार एकसारखेच:एकनाथ शिंदेंची बौद्धिक घेतल्यानंतर प्रतिक्रिया; म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा आनंद

संघ आणि संघ परिवार यांच्याशी माझे नाते लहानपणापासूनचे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेनेच्या शाखेत मी दाखल झालो आणि बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांशी जोडला गेलो. शिवसेना आणि संघ यांचे विचार एकसारखे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. निरपेक्ष भावनेने कसे काम करावे? हे संघ परिवाराकडून शिकावे, असे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करतो. देशभरात संघाच्या पाच लाख शाखा असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. संघाला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या देशाच्या सेवेमध्ये संघाचे योगदान कोणालाही नाकारता येणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. संघाची शिकवण ही जोडणारी आहे, ती तोडणारी नाही, असे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार हिंदुत्वाचे विचार पुढे नेऊन आम्ही देखील महायुतीचे सरकार स्थापन केले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. हे बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. संघ विचाराप्रमाणेच कुठलाही स्वार्थ भाव न ठेवता, आम्हाला काय मिळेल यापेक्षा जनतेला काय मिळेल, हे मागच्या अडीच वर्षात महायुती सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिले आहे. त्याचीच पोचपावती म्हणून प्रचंड यश महायुतीला दिले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा आनंद देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले, याचा आनंद माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकालाच प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आणि पुढचे काम करण्यासाठी अधिक बळ मिळते, असा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे. जो खऱ्या अर्थाने समाजसेवा करणारा व्यक्ती आहे, त्याने जरूर एकदा संघ मुख्यालयाला भेट द्यावी, असे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे आज आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आले असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

  

Share