बेताल वक्तव्य करून नवीन प्रश्न निर्माण करू नका- अजित पवार:म्हणाले- राज्य अशी वक्तव्य सहन करत नाही, खोतांच्या वक्तव्याचा निषेध
निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात अनेक नेते येतील, प्रचार सभा हाेतील, मात्र काेणी काेणाबद्दल काही आक्षेपार्ह बाेलू नये. प्रत्येकाची विचारधारा वेगळी असून मतमतांतर असू शकते परंतु ते मांडत असताना काहीतरी त्यास ताळमेळ असावा. विनाशकाले विपरीत बुध्दी असा हा प्रकार आहे. सदा खाेत यांनी पुन्हा असा प्रकार हाेणार नाही असे सांगितले आहे. बेताल वक्तव्य करून नवीन प्रश्न निर्माण करू नका, राज्य अशी वक्तव्य सहन करत नाही हे देखील त्यांना मी सांगितले असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अजित पवार म्हणाले, राज्यात सुसंस्कृत राजकारण कसे करावे याबाबत पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिले. विराेधकांच्या बद्दल बाेलताना पातळी कशी साेडायची नाही, कंबरे खालचे वार कसे करावयाचे नाही हे समजवले. अाराेप -प्रत्याराेप हाेताना अापले म्हणणे कसे मांडावे हे देखील त्यांनी शिकवले. तीच पध्दत वसंतराव नाईक, वसंत पाटील, शरद पवार, विलास देशमुख यांनी चालू ठेवली. सदाभाऊ खाेत यांनी शरद पवार यांच्या बद्दल केलेले वक्तव्य निषेधार्ह असून त्याचा अाम्ही जाहीर निषेध करताे. खाेत यांना फाेन करुन मी त्यांना तुमचे वक्तव्य बराेबर नाही असे बाेलणे बंद करा असे सांगितले. व्यैक्तिक काेणाबद्दल बाेलणे ही अापली पध्दत नाही. केवळ पवार साहेंबा बद्दल असे घडले नाही पाहिजे तर काेणाच्या बाबतीत अशा टिका करण्यात येऊ नये. राज्यात दाेन -चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ते कमी करण्याचा प्रयत्न अाम्ही करत अाहे. भाेर मध्ये अधिकृत उमेदवार नाही. पुरंदर, श्रीरामपूर, देवळाली, सिंदखेडराजा येथे काही उमेदवार उभे राहिले अाहे. त्याबाबत संबंधितांशी चर्चा केली जात अाहे. त्यातून मार्ग काढण्याचा काम करण्यात येत अाहे. माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर केवळ अाराेप झाले ते अद्याप सिध्द झाले नाही त्यामुळे त्यांच्या प्रचार रॅलीत मी जाणार अाहे. डाॅ.अांबेडकरांची घेतली भेट वंचित बहुजन अाघाडीचे नेते अॅड.प्रकाश अांबेडकर यांची नुकतीच अॅन्जीअाेप्लाॅस्टी शस्त्रक्रिया पुण्यातील पूना हाॅस्पिटल येथे पार पडली. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अांबेडकर यांच्या भाेसलेनगर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत तब्येतीची चाैकशी केली. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत अाहे.