सिशिव मुंडेने घेतली वडिलांची बाजू:माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव, मुलाच्या पोस्टवर करुणा शर्मांची प्रतिक्रिया

मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कोर्टाने घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवले आहे. यानुसार आता धनंजय मुंडे यांना आता करुणा शर्मा यांना पोटगी द्यावी लागणार आहे. तसेच कोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा सिशिव मुंडे याने वडिलांच्या म्हणजे धनंजय मुंडे यांच्या बाजूने एक पोस्ट लिहिली आहे. वडील आईसोबत कठोर असले तरी आमच्यासोबत ते चांगलेच आहेत, असे त्याने लिहिले आहे. तसेच आईच आम्हा सर्वांचा छळ कर्ते असे देखील त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. यावर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. करुणा शर्मा म्हणाल्या, मुलगा जे म्हणाला आहे ते खरे आहे. धनंजय मुंडे यांचे माझ्या मुलांसोबत चांगले नाते होते. त्यांच्यामध्ये कोणतेही वाद नाहीत. आजची पत्रकार परिषद कोर्टाच्या निकालावर होती. माझ्या मुला बाळांवर देखील दबाव येत आहे. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे. मुलांना काय वाटते आणि मुलांच्या वडिलांना वाटते की मी मीडियात बोलू नये. किंवा कोर्टात जाऊ नये, असे त्यांना वाटते. हे 2019 पासून मीडिया ट्रायल सुरू आहे, हे त्यांना छळ वाटत आहे, असे स्पष्टीकरण करुणा शर्मा यांनी दिले आहे. पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, आमच्या मुलांना हे वाद नको आहेत. ते म्हणतात, तुम्ही कोर्ट केस संपवून टाका. आज निकाल लागला, त्याला मी काय करणार? मी याबाबत काय वाईट देखील बोलले नाही. कोर्टाने निकाल दिला, त्याबाबतच मी बोलत होते. माझ्या नवऱ्याचा सातत्याने मुलाला फोन येत होता, जेव्हा मी मीडियाशी बोलत होते. मी रखेल बनून जगू शकत नाही. मी बोलत राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या. माझा नवरा आणि मी मिळून आमच्या मुलांना छळतोय, हे खरे आहे. हे मी मान्य करते. माझी मुले माझ्यासोबत राहतात. माध्यमांतील प्रतिनीधींना देखील याबाबत माहिती आहे. त्यांच्यावर सातत्याने दबाव असतो. त्याच्यावर पोस्ट टाकण्यासाठी दबाव आहे. तो खूप लहान आहे. तो गेल्या अनेक वर्षापासून सहन करतोय. त्यांचा खरोखर छळ सुरु आहे. ज्या माझ्या वाईट गोष्टी आहेत, त्या मी मान्य करते. माझ्या नवऱ्याला हे समजत नाही. माझ्या मुलांवर धनंजय मुंडेंचा दबाव आहे, असेही करुणा शर्मा म्हणाल्या. तसेच धनंजय मुंडेंच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे, तो मंत्री आहे. मुला बाळांना जेलमध्ये जायचे नाही. त्यांना केसेस नको आहेत. ते म्हणातात, आम्हाला यामध्ये पडायचे नाही. कर्जाबाबत त्याने केलेल्या आरोपांवर मी पुरावे देऊ शकते, असेही त्यांनी म्हंटले आहे.

  

Share