स्नेहालयात दीपोत्सव, दोन हजार दिव्यांनी उजळला प्रकल्प परिसर:स्नेहबंध प्रकल्पाच्या माध्यमातून ७०० माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

स्नेहालय सामाजिक विश्वस्त संस्थेतर्फे अनाथ एक पालक काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांचे संगोपन शिक्षण व पुनर्वसनाचे काम केले जाते. स्नेहालय संस्थेतून या सेवांचा लाभ घेऊन समाजामध्ये संस्थेतून बाहेर पडलेल्या मुला मुलींची संख्या ७२३ आहे. या सर्व मुला मुलींच्या जीवनात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी स्नेहालय संस्थेचा स्नेहबंध प्रकल्प कार्यरत आहे. स्नेहबंध प्रकल्पाचे संजय चाबुकस्वार यांच्या संकल्पनेतून आयोजित स्नेह मेळावा एम.आय.डी.सी येथील रवींद्रनाथ टागोर सभागृहात झाला. या मेळाव्यास मुंबई, नाशिक, पुणे येथून मुला मुलींनी सहभाग नोंदवला. दीपप्रज्वलनाने व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मिलिंद कुलकर्णी यांनी विशेष घटकातील मुलांना एआरटी औषधाचे महत्त्व, टीबीची औषधे घेणे सोडल्याने होणारे परिणाम, मुला-मुलींची सध्याचे विवाह, स्व प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व, वाहन अपघात, तरुणाई मधील व्यसनाधीनता, अनाथ मुलांच्या जीवनात नातेसंबंधाचे महत्व यावर मार्गदर्शन केले. अनिल गावडे यांनी पौगंडवस्थेतील मुले व त्यांच्या समस्या, संस्थात्मक मुलांना डोळ्यासमोर ठेवून सर्व मुलांसमोर मांडल्या. राजीव गुजर, शशिकांत सातभाई संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित सर्व मुला-मुलींना शुभेच्छा दिल्या. संध्याकाळच्या सत्रात मुला मुलींचे सामूहिक डान्स केला. सर्वांना दिवाळीचे किट वाटप करण्यात आले. परिसरात २ हजार दिव्यांची दिव्यांची रोषणाई केली होती. फटाक्यांच्या आतषबाजीने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन समुपदेशक प्रियांका कोंगळे, प्रास्ताविक समाधान धालगडे यांनी केले. स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्रित आलेले स्नेहालय प्रकल्पातील माजी विद्यार्थी.

  

Share