आत्महत्येचा धक्कादायक CCTV:वलसाड रेल्वे स्थानकावर ट्रेन येताच तरुणाने मारली रुळावर उडी, जागीच मृत्यू

गुजरातमधील वलसाड रेल्वे स्थानकावर बुधवारी संध्याकाळी एका तरुणाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. आत्महत्येची संपूर्ण घटना रेल्वे फलाटावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचे फुटेज आज समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये हा तरुण फलाटावर ट्रेन येण्याची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. ट्रेन जवळ येताच तो वेगाने धावत रुळावर उडी मारतो. संपर्क क्रांतीने रेल्वेखाली उडी घेतली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर बराच वेळ चालत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. दरम्यान, संपर्क क्रांती एक्स्प्रेसची सायंकाळी 7.43 वाजता येण्याची वेळ होती. ट्रेन जवळ येताच तरुणाने रुळावर उडी मारली. आत्महत्येचे हे भीषण दृश्य पाहून फलाटावर बसलेले लोक हादरले. तरुणाची ओळख पटू शकली नाही भरधाव वेगात आलेल्या रेल्वेखाली चिरडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वलसाड जीआरपीचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाच्या मृतदेहाचा प्राथमिक तपास केला. मात्र कोणतेही ओळखपत्र मिळाले नाही. रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. सध्या आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment