सातारा पोलिस दलाच्या बॉम्ब शोधक (BDS) पथकातील ‘सूर्या’ श्वानाचा मंगळवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. सूर्याच्या एक्झिटने पोलिस दलावर शोककळा पसरली. शासकीय इतमामात मानवंदना देवून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झारखंडमधील ऑल इंडिया ड्युटी मीट स्पर्धेत सूर्याने सुवर्णपदक पटकावत सातारा जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. मंगळवारी सकाळी सूर्याचे हॅन्डलर (सांभाळ करणारे पोलिस) सागर गोगावले आणि नीलेश दयाळ त्याचे खाद्य घेऊन गेले होते. त्यावेळी सूर्या कळवळला आणि बेशुद्ध पडला. दाेन्ही हॅन्डलरनी त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला. प्रथमोपचारही दिले. मात्र, सूर्याने कसलाही प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी त्याला पशुवैद्यकीय अधिकार्यांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी करून हृदयविकाराच्या झटक्याने सूर्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. सूर्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पोलीस दलावर शोककळा पसरली. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून सूर्याला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शासकीय इतमामात सूर्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा पोलिस दलातील बॉम्ब शोधक-नाशक पथकातील सूर्या श्वान आणि त्याचा हॅन्डलर पोलीस हवालदार नीलेश दयाळ यांना झारखंडमधील रांचीत झालेल्या ’68 व्या ऑल इंडिया ड्युटी मीट’मध्ये ‘ट्रॅकिंग’ आणि ‘शोध’ या दोन्ही प्रकारात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुवर्णपदक मिळाले होते. सूर्या हा मंगळवारी सकाळपर्यंत ठणठणीत होता. सोमवारी वीर धरणासह अनेक ठिकाणी हॅन्डलरसोबत त्याने कर्तव्य बजावलं होतं. अवघ्या 45 दिवसांचा असताना सूर्याला पुण्यातून सातारा पोलिस दलात आणलं होतं. गेली आठ वर्षे त्यानं सातारा पोलिस दलाची सेवा केली. वयाच्या 8 व्या वर्षी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. सुर्याची कामगिरी