तारापूर एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग:अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्याला आज भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बाबत अद्याप अधिकची माहिती मिळू शकली नाही. मुंबईला लागून असलेल्या पालघरमधील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्यात पहाटे भीषण आग लागली. अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्यानंतर कारखान्यातून काळ्या धुराचे लोट बाहेर पडत आहेत. याचा व्हिडिओही समोर आला आहे. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या काळ्या धुराचे लोट आकाशात वरपर्यंत जाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, आग कशी लागली? त्याची कारणे अद्याप कळू शकलेली नाहीत. 20 सप्टेंबर रोजी केमिकल कारखान्याला लागली होती आग याआधी 20 सप्टेंबर 2024 रोजी पालघरमध्ये एका रासायनिक कारखान्याला आग लागली होती. या आगीत सहा कर्मचारी जखमी झाले हसेते. राज मौर्य, निशिकांत चौधरी, पवन देसले, संतोष हिंदलेकर, आदेश चौधरी आणि चंदन शहा अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा येथे आगीची घटना समोर आली आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….

  

Share