तेलंगणात बलात्कार पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपींवर केला हल्ला:घराला आग लावली, पोलिस वाचवण्यासाठी आले असता त्यांच्यावरही हल्ला केला

तेलंगणातील गुडीहतनूर गावात लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी संशयित आरोपीच्या घरावर हल्ला केला. यानंतर येथे हिंसाचार उसळला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे पोहोचून संशयिताची सुटका करून त्यांना रुग्णालयात नेले, त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिस पथकावरही हल्ला केला. पाहा घटनेशी संबंधित छायाचित्रे… तरुणावर मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याचा आरोप वृत्तानुसार, एका तरुणाने एका तरुणीचे अपहरण करून तिला आपल्या घरात कैद करून ठेवले होते. त्याने मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मुलीच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी तातडीने त्याचे घर गाठून तरुणावर हल्ला केला. गावकऱ्यांनी आरोपीचे घर आणि पोलिसांच्या दोन गाड्या पेटवून दिल्या. या हल्ल्यात एका सर्कल इन्स्पेक्टरसह अनेक पोलिस जखमी झाले.

Share