आघाडीत समावेशासाठी MIMचा प्रस्ताव:किती जागा देणार तेवढे सांगा, जलील यांचे आवाहन; तर नवीन पक्षाला जागा देणे कठीण, संजय राऊतांकडून स्पष्ट

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या वतीने महाआघाडीमध्ये समावेश होण्याची भूमिका घेण्यात आली आहे. यासंदर्भातला प्रस्ताव महाविकास आघाडीकडे पाठवण्यात आला आहे. महाविकास आघाडी मध्ये आम्हाला किती जागा देणार, हे तुम्ही स्पष्ट करा, असे आवाहन एमआयएमचे राज्यातील प्रमुख नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवीन पक्षाला महाआघाडीमध्ये जागा देणे कठीण असल्याचे म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्ष हा आघाडीमध्ये जाण्यास इच्छुक आहे. तसा प्रस्ताव देखील एमआयएमच्या वतीने महाविकास आघाडीला देण्यात आला आहे. या संदर्भात शरद पवार यांनी भूमिका घेण्याचे आवाहन एमआयएमच्या वतीने करण्यात आले आहे. शरद पवार यांनी देखील सकारात्मक संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आघाडीमध्ये नवीन पक्षाला जागा नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष आहेत. याशिवाय कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग, शेतकरी कामगार पक्ष आणि मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणारा समाजवादी पक्ष देखील आघाडीमध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणे आम्हाला कठीण दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. वास्तविक आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष आहेत. कम्युनिस्ट, शेतकरी, मुस्लिम समाज याबरोबरच रिपब्लिकन पक्षाच्या काही संघटना देखील आघाडीमध्ये आहेत. त्यामुळे या सर्व परिस्थितीत राज्यात केवळ 288 मतदारसंघ आहेत. अशावेळी नवीन पक्षाला महाआघाडीमध्ये जागा देणे आम्हाला कठीण दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी काही भूमिका घेतली असेल तर त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करू, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… वाराणसीत मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवली:राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय षडयंत्राचा आरोप तर थोरात-बावनकुळेंनीही व्यक्त केली नाराजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या आधीही साईबाबांच्या जन्म आणि धर्मावरून वाद निर्माण झाले होते. वाराणसीच्या मंदिरांतून साई मूर्ती हटवण्यावरून राजकारणही तीव्र होताना दिसत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जे काही होत आहे ते योग्य नसल्याचे या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा… भाजपला श्रेय घेण्याची सवय:मराठी भाषेबरोबरच राज्याची प्रतिष्ठाही वाढली पाहिजे, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली अपेक्षा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा मोठा सन्मान आहे. बंगाली, मराठी, पाली, प्राकृत आणि आसामी या पाच भाषांना हा सन्मान देण्यात आला आहे. मराठी भाषेला हा सन्मान मिळावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. पूर्ण बातमी वाचा… राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती 6 ऑक्टोबरपासून:जिल्हानिहाय मुलाखतीचे नियोजन काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राहुल यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. काँग्रेसकडे 1688 उमेदवारांनी अर्ज केले आहे. त्यामुळे 8 ऑक्टोबर पर्यंत इच्छुकांच्या जिल्हानिहाय मुलाखती घेण्याचे नियोजन वरिष्ठ नेत्यांनी केले होते. परंतु, राहुल गांधी 4, 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मुलाखती 6 ऑक्टोबर पर्यंत लांबल्या आहेत. पूर्ण बातमी वाचा…

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या वतीने महाआघाडीमध्ये समावेश होण्याची भूमिका घेण्यात आली आहे. यासंदर्भातला प्रस्ताव महाविकास आघाडीकडे पाठवण्यात आला आहे. महाविकास आघाडी मध्ये आम्हाला किती जागा देणार, हे तुम्ही स्पष्ट करा, असे आवाहन एमआयएमचे राज्यातील प्रमुख नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नवीन पक्षाला महाआघाडीमध्ये जागा देणे कठीण असल्याचे म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्ष हा आघाडीमध्ये जाण्यास इच्छुक आहे. तसा प्रस्ताव देखील एमआयएमच्या वतीने महाविकास आघाडीला देण्यात आला आहे. या संदर्भात शरद पवार यांनी भूमिका घेण्याचे आवाहन एमआयएमच्या वतीने करण्यात आले आहे. शरद पवार यांनी देखील सकारात्मक संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आघाडीमध्ये नवीन पक्षाला जागा नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष आहेत. याशिवाय कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग, शेतकरी कामगार पक्ष आणि मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणारा समाजवादी पक्ष देखील आघाडीमध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणे आम्हाला कठीण दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. वास्तविक आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष आहेत. कम्युनिस्ट, शेतकरी, मुस्लिम समाज याबरोबरच रिपब्लिकन पक्षाच्या काही संघटना देखील आघाडीमध्ये आहेत. त्यामुळे या सर्व परिस्थितीत राज्यात केवळ 288 मतदारसंघ आहेत. अशावेळी नवीन पक्षाला महाआघाडीमध्ये जागा देणे आम्हाला कठीण दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी काही भूमिका घेतली असेल तर त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करू, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… वाराणसीत मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवली:राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय षडयंत्राचा आरोप तर थोरात-बावनकुळेंनीही व्यक्त केली नाराजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या आधीही साईबाबांच्या जन्म आणि धर्मावरून वाद निर्माण झाले होते. वाराणसीच्या मंदिरांतून साई मूर्ती हटवण्यावरून राजकारणही तीव्र होताना दिसत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जे काही होत आहे ते योग्य नसल्याचे या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा… भाजपला श्रेय घेण्याची सवय:मराठी भाषेबरोबरच राज्याची प्रतिष्ठाही वाढली पाहिजे, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली अपेक्षा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा मोठा सन्मान आहे. बंगाली, मराठी, पाली, प्राकृत आणि आसामी या पाच भाषांना हा सन्मान देण्यात आला आहे. मराठी भाषेला हा सन्मान मिळावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. पूर्ण बातमी वाचा… राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती 6 ऑक्टोबरपासून:जिल्हानिहाय मुलाखतीचे नियोजन काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राहुल यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. काँग्रेसकडे 1688 उमेदवारांनी अर्ज केले आहे. त्यामुळे 8 ऑक्टोबर पर्यंत इच्छुकांच्या जिल्हानिहाय मुलाखती घेण्याचे नियोजन वरिष्ठ नेत्यांनी केले होते. परंतु, राहुल गांधी 4, 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे मुलाखती 6 ऑक्टोबर पर्यंत लांबल्या आहेत. पूर्ण बातमी वाचा…  

Share