ठाकरे कुटुंबाचा 18 वर्षांनंतरचा एकत्र फोटो:राज शेजारी आदित्य अन् उद्धव शेजारी अमित ठाकरे; सुप्रिया सुळे यांनी हात धरून केले उभे ठाकरे कुटुंबाचा 18 वर्षांनंतरचा एकत्र फोटो:राज शेजारी आदित्य अन् उद्धव शेजारी अमित ठाकरे; सुप्रिया सुळे यांनी हात धरून केले उभे

ठाकरे कुटुंबाचा 18 वर्षांनंतरचा एकत्र फोटो:राज शेजारी आदित्य अन् उद्धव शेजारी अमित ठाकरे; सुप्रिया सुळे यांनी हात धरून केले उभे

त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी सक्तीला विरोध करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 18 वर्षानंतर एका व्यासपीठावर आले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वच राजकीय पक्षातील उपस्थित नेते यांना देखील व्यासपीठावर आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र या सर्वात आदित्य ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही एकत्र व्यासपीठावर आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी हात पकडून आदित्य ठाकरे यांना राज ठाकरे यांच्या बाजूला उभे केले. तर उद्धव ठाकरे यांनी देखील अमित ठाकरे यांना आपल्या बाजूला बोलावून घेतले. या विजयी मेळाव्यानंतर ठाकरे कुटुंबांनी एकत्र येत फोटो काढले. यावेळी आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांच्या बाजूला तर अमित ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूला उभे होते. सुप्रिया सुळे यांनी या दोघांना बाजूला उभे केले. त्यामुळे ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांचे नेत्र सुखावले, असेच म्हणावे लागेल. उद्धव ठाकरेंकडून अनाजीपंत म्हणत फडडणवीसांचा उल्लेख या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी… मला कल्पना आहे की, अनेक बुवा, महाराज हे बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, कुणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सर्वांना सांगतो की, या भोंदूपणाविरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यापुढे उभे टाकलो आहोत. ते पुढे म्हणाले, भाषेवरून एखादा विषय निघतो, तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळात अगदी दोघांनी म्हणजे मी व राज काय आपण सर्वांनी या नतदृष्टांचा अनुभव घेतला आहे. वापराये आणि फेकून द्यायचे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतलात, अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होते. कोणत्या भाषेत बोलत होतात. राज यांनी सर्वांच्या शाळा काढल्या, पण मोदींची शाळा कोणती? सर्वात उच्चशिक्षित आहेत.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *