देशात सध्या ‘करा किंवा मरा’ अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भाजपला आमचा ‘चले जाव’चा संदेश असल्याचेही त्यांनी सांगितले. महात्मा गांधी यांचे स्वप्न पुढे घेऊन जाण्याचा आमचा संकल्प असल्याचेही सपकाळ यांनी म्हटले आहे. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारत छोडो चळवळीच्या 83 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेसने मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर निदर्शने केली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेसने भारत छोडो चळवळीच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत मोर्चा देखील काढला. या वेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “हा मोर्चा महात्मा गांधींचा संकल्प पुढे नेण्याची प्रतिज्ञा आहे… या देशात हुकूमशाही आणण्याच्या प्रयत्ना विरुद्ध लोकांनी आपला संघर्ष सुरू ठेवला पाहिजे, ज्यामुळे ‘करा किंवा मरा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज आम्ही भाजपला निघून जाण्याचा संदेश देत असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. जनतेने रस्त्यावर उतरून सरकारला शक्ती दाखवणे महत्त्वाचे – तुषार गांधी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी देखील उपस्थित होते. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, आजच्या काळात जेव्हा आपले हक्क हिरावले जात आहेत आणि मतदान प्रक्रियेत फेरफार करण्याचे षड्यंत्र उघड झाले आहे, तेव्हा भारतातील प्रत्येक नागरिकाला जन क्रांतीचे महत्त्व माहित असले पाहिजे म्हणून या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. लोकसभेचे खासदार आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ईडीवरील केलेल्या आरोपांवर ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने त्यांचे आरोप योग्यरित्या फेटाळले नाहीत. असे दिसते की ते सबबी सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत… म्हणून, जनतेने रस्त्यावर उतरून सरकारला आपली शक्ती दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” महात्मा गांधी यांचे स्वप्न पुढे घेऊन जाण्याचा संकल्प – हर्षवर्धन सपकाळ आज देशातील व्यवस्थेला तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने त्याला नाकारण्याचा संकल्प आम्ही करत आहोत. महात्मा गांधी यांचे स्वप्न पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आम्ही या पद यात्रेच्या माध्यमातून करत असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. आपल्या देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी, आज करो किंवा मरो अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आज आम्ही चले जाव असा संदेश असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भात आक्षेप आणि तथ्य समोर आणले होते. त्यानंतर बिहारमधील मतदार यादीत भारतीय जनता पक्षाची दलाली समोर आली आहे. हा लढा आम्ही बिहारमध्ये देखील लढणार आहोत. या लढ्याला आम्ही कुठे खंड पडू देणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटी या संदर्भात निदर्शने करत आहे. या प्रकरणावर आम्ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतलेली असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी काल म्हटले होते. राहुल गांधी यांचे सर्व दावे हे पुरव्याणीशी सत्याची लढाई लढण्यासाठी राहुल गांधी आता पुढे सरसावले आहेत. राहुल गांधी यांनी निवडणुकीमध्ये झालेल्या मतांच्या चोरी संदर्भात सर्व दावे हे पुरव्याणीशी केलेले आहेत. सात फूट उंचीचे दस्तावेज यासंदर्भात त्यांनी दिले आहेत. हे सर्व दस्तावेज हे शासकीय आहेत. या सर्व दाव्यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे, हे सर्व दावे तपासले जाऊ शकतात, असे देखील सपकाळ यांनी म्हटले होते.