चालक दारूच्या नशेत ऑडीने वाहने ठोकरत होता:तेव्हा बावनकुळेंचा मुलगा गाडीतच होता

चालक दारूच्या नशेत ऑडीने वाहने ठोकरत होता:तेव्हा बावनकुळेंचा मुलगा गाडीतच होता

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या भरधाव ऑडी कारने रविवारी मध्यरात्री पाच दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कुणाचा जीव गेला नसला तरी एक जण जखमी झाला आहे. अपघातानंतर संकेतसह गाडीतील तिघेही पळून गेले होते. त्यापैकी दोघांना पोलिसांनी सोमवारी अटक केली, संकेतवर मात्र कारवाई झाली नव्हती. दरम्यान, कारचालकाने दारू प्यायल्याचे तपासणीत उघड झाले आहे. तसेच मंगळवारी संकेतची चौकशी केली असता अपघातावेळी तो ऑडीमध्येच असल्याचे त्याने कबूल केले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. रविवारी मध्यरात्री रामदासपेठेतील सेंट्रल बाजार रोडवरील हाॅटेल सेंटर पाॅइंटसमोर भरधाव इलेक्ट्रिक आॅडी कारने (एमएच ४०/ सीवाय ४०४०) दुचाकीसह चार चाकी वाहनांना धडक दिली. यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेले नसले तरी वाहनांचे नुकसान झालेले आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. आधी कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचे दिसून आले. मात्र, नंतर ही नंबरप्लेट कारमध्येच असल्याचे पोलिसांना आढळून आल्याचे मदने यांनी सांगितले. अपघात झाला तेव्हा संकेत बावनकुळे कारमध्ये होते की नाही, याबाबत सुरुवातीला स्पष्टता नव्हती. सोमवारी याबाबत लपवाछपवी करण्याचा प्रयत्न सुरु होता. पोलिसांनीही प्रारंभी यावर बोलणे टाळले. मात्र, या प्रकरणाची खूपच चर्चा सुरु झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी संकेत यांची बोलावून चौकशी केली. त्याने अपघातावेळी आपण कारमध्येच असल्याची कबुली दिल्याचे मदने यांनी सांगितले. ‘चालक अर्जुन जितेंद्र हावरे, संकेत बावनकुळे, रोनित चित्तमवार हे तिघे गाडीत होते. त्यानुसार आपण तिघांनाही चौकशीसाठी बोलवले होते. चौकशी झाली आहे. चालकाला अटक केली होती. रात्री उशीरा त्याला जामीन देण्यात आला आहे’, असे मदने यांनी सांगितले. कार अर्जुन हावरे चालवत होता, तर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आणि रोहित चिंतमवार (२७) मागच्या सीटवर बसला होता. याशिवाय, अपघात झाल्यानंतर पुढच्या चौकात या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांना अडवले. काही जणांनी मारहाणही केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मात्र, संकेत बावनकुळेंना मारहाण झाली किंवा नाही, याबाबत पोलिसांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. हाॅटेलमधून घरी जाताना अपघात, संकेतची मात्र रक्ततपासणी नाही : एका हाॅटेलमधून जेवण करून घरी जात असताना हा अपघात घडल्याचे सीसीटीव्ही फूटेजच्या तपासात दिसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ‘यावेळी चालक नशेत होता असे आढळून आले आहे. डॉक्टरांनी तसे रिपोर्ट दिले आहेत. त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट यायचा आहे. रात्री दोघांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यात ते नशेत होते असा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. चालकावर गुन्हा दाखल आहे. रोहित वा संकेतवर गुन्हा दाखल नाही. त्याबाबत तपास सुरू आहे. पण संकेत याच्या रक्ताची तपासणी करण्यात आलेली नाही. आतापर्यंत तीन गाड्यांचे नुकसान झालेले आहे. यात कुणीही गंभीर जखमी झालेले नाही. त्यांच्यावर उपचार करून त्यांना लगेच घरी सोडण्यात आलं आहे, असे मदने यांनी सांगितले.

​भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या भरधाव ऑडी कारने रविवारी मध्यरात्री पाच दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कुणाचा जीव गेला नसला तरी एक जण जखमी झाला आहे. अपघातानंतर संकेतसह गाडीतील तिघेही पळून गेले होते. त्यापैकी दोघांना पोलिसांनी सोमवारी अटक केली, संकेतवर मात्र कारवाई झाली नव्हती. दरम्यान, कारचालकाने दारू प्यायल्याचे तपासणीत उघड झाले आहे. तसेच मंगळवारी संकेतची चौकशी केली असता अपघातावेळी तो ऑडीमध्येच असल्याचे त्याने कबूल केले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. रविवारी मध्यरात्री रामदासपेठेतील सेंट्रल बाजार रोडवरील हाॅटेल सेंटर पाॅइंटसमोर भरधाव इलेक्ट्रिक आॅडी कारने (एमएच ४०/ सीवाय ४०४०) दुचाकीसह चार चाकी वाहनांना धडक दिली. यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेले नसले तरी वाहनांचे नुकसान झालेले आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. आधी कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचे दिसून आले. मात्र, नंतर ही नंबरप्लेट कारमध्येच असल्याचे पोलिसांना आढळून आल्याचे मदने यांनी सांगितले. अपघात झाला तेव्हा संकेत बावनकुळे कारमध्ये होते की नाही, याबाबत सुरुवातीला स्पष्टता नव्हती. सोमवारी याबाबत लपवाछपवी करण्याचा प्रयत्न सुरु होता. पोलिसांनीही प्रारंभी यावर बोलणे टाळले. मात्र, या प्रकरणाची खूपच चर्चा सुरु झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी संकेत यांची बोलावून चौकशी केली. त्याने अपघातावेळी आपण कारमध्येच असल्याची कबुली दिल्याचे मदने यांनी सांगितले. ‘चालक अर्जुन जितेंद्र हावरे, संकेत बावनकुळे, रोनित चित्तमवार हे तिघे गाडीत होते. त्यानुसार आपण तिघांनाही चौकशीसाठी बोलवले होते. चौकशी झाली आहे. चालकाला अटक केली होती. रात्री उशीरा त्याला जामीन देण्यात आला आहे’, असे मदने यांनी सांगितले. कार अर्जुन हावरे चालवत होता, तर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आणि रोहित चिंतमवार (२७) मागच्या सीटवर बसला होता. याशिवाय, अपघात झाल्यानंतर पुढच्या चौकात या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांना अडवले. काही जणांनी मारहाणही केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मात्र, संकेत बावनकुळेंना मारहाण झाली किंवा नाही, याबाबत पोलिसांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही. हाॅटेलमधून घरी जाताना अपघात, संकेतची मात्र रक्ततपासणी नाही : एका हाॅटेलमधून जेवण करून घरी जात असताना हा अपघात घडल्याचे सीसीटीव्ही फूटेजच्या तपासात दिसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ‘यावेळी चालक नशेत होता असे आढळून आले आहे. डॉक्टरांनी तसे रिपोर्ट दिले आहेत. त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट यायचा आहे. रात्री दोघांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यात ते नशेत होते असा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. चालकावर गुन्हा दाखल आहे. रोहित वा संकेतवर गुन्हा दाखल नाही. त्याबाबत तपास सुरू आहे. पण संकेत याच्या रक्ताची तपासणी करण्यात आलेली नाही. आतापर्यंत तीन गाड्यांचे नुकसान झालेले आहे. यात कुणीही गंभीर जखमी झालेले नाही. त्यांच्यावर उपचार करून त्यांना लगेच घरी सोडण्यात आलं आहे, असे मदने यांनी सांगितले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment