सदाभाऊ खोतांनी मंत्रिमंडळ विस्तारात नाव नसल्याने व्यक्त केली नाराजी:म्हणाले- कृषी खात मिळाले असते तर शेतकऱ्यांसाठी चांगली धोरण आणता आली असती
आमचा संघर्ष दिर्घकालीन, आमचा संघर्ष हा सत्तेसाठी नव्हता. नक्कीच ज्या प्रश्नासाठी लढलो, रक्त सांडलं, ते कृषी खात मिळाले असते तर आवडले असत. शेतकऱ्यांसाठी चांगली धोरण आणता आली असती. पण संघर्ष आमच्या सोबत आहे, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सदाभाऊ खोत म्हणाले की, अधिवेशनात कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकर्याला दिलासा मिळाला पाहिजे आणि सिंचन प्रकल्पाला गती मिळाली पाहिजे. कर्जमाफी नक्की होईल. सत्तेत असूनही संघर्ष आमचा सावत्र भाऊ सदाभाऊ खोत म्हणाले की, सर्व नव्या मंत्र्यांच अभिनंदन करतो. गोपीचंद पडळकर किंवा सदाभाऊ खोत हे विस्थापितांसाठी लढत आलो आहे. आम्ही अजून संघर्ष करु. सत्तेत असूनही संघर्ष आमचा सावत्र भाऊ आहे. जे विस्थापित आहेत, कष्टकरी लोकांचा वर्ग असतो. त्यांचा संघर्ष कधीच संपत नाही. त्यात आम्ही लहाणाचे मोठे झालो. पण देवाभाऊ सारखे नेत्रुत्व आहे याचा आम्हांला आनंद आहे. त्यांनी निर्णय घेतले. ते मुख्यमंत्री व्हावेत ही आमची अपेक्षा होती. 33 वर्षांनंतर नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार महाराष्ट्रात तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी होणार आहे. यापूर्वी 21 डिसेंबर 1991 रोजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा नागपुरात विस्तार झाला होता. आज मंत्रिमंडळ विस्तारात 30-32 मंत्री शपथ घेऊ शकतात. त्यापैकी 20-21 भाजपचे आमदार मंत्री होऊ शकतात. शिवसेनेला 11-12 आणि राष्ट्रवादी-अजित गटाला 9-10 मंत्रीपदे मिळू शकतात.