खोऱ्यात मोहीम:दहशतवाद्यांना आश्रय देणारेच आता बनले लष्कराचे खबरे!, संपत्ती जप्त, पाठीराख्यांचा मार्ग बदल

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या पाठीराख्यांविरुद्ध लष्कराने एक महिन्यापासून मोहीम राबवली होती. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यांना ओव्हर ग्राउंड वर्कर (ओजीडब्ल्यू) म्हटले जाते. हेच लोक आधी दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे काम करत होते. एवढेच नव्हे तर लष्कराची माहिती पुरवायचे. परंतु आता ते स्वत:च लष्कराला दहशतवाद्यांचा सुगावा देत आहेत. एक महिन्यात अशा २० ओजीडब्ल्यूंची धरपकड झाली. १५ हून जास्त जणांची संपत्ती जप्त केली. त्या भीतीने आेजीडब्ल्यू धास्तावलेत. स्वत:हून माहिती देऊ लागले आहेत. गुरुवारी या खबऱ्यांच्या माहितीवरूनच चकमक सुरू झाली होती. कुलगामच्या बेहीबागमध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा सर्वात जुन्या कमांडरपैकी असलेला फारूक नाली आल्याचे आेजीडब्ल्यूने सांगितले होते. तो ए++श्रेणीचा दहशतवादी होता. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीसही होते. ग्राम रक्षण समितीला रायफल्सचा पुरवठा सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी ग्राम रक्षण समित्यांना (व्हीडीसी) स्वसंरक्षणासाठी लोडिंग रायफल्स दिल्या आहेत. कारण सीमा हे सुरक्षेची पहिली पायरी ठरते. ओजीडब्ल्यूची माहिती द्या, बक्षीस घ्या खोऱ्यात सुरक्षा संस्थेच्या १२ टीम ओजीडब्ल्यूच्या शोधात आहेत. दहशतवाद्यांची माहिती दिल्यास रोख बक्षीस घ्या, अशी माहिती अतिरेक्यांना मदत देणाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. शाह यांची सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक.. नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा अधिकारी व जम्मू-काश्मीर प्रशासनसोबत महत्त्वाची बैठक घेतली. विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिली बैठक आहे. गृहमंत्र्यांनी राज्यासाठी २०२५ चा सुरक्षा आराखडा मागवला आहे. काश्मिरात चकमक..हिज्बुल कमांडरसह ५ अतिरेकी ठार जम्मू-काश्मीरमध्ये ९५ दहशतवादी सक्रिय आहेत. त्यापैकी ६० टक्के परदेशी आहेत. जम्मूच्या राजौरी, पूंछ, डोडा, किश्तवाडमध्ये ६० तर खोऱ्यात ३५ दहशतवादी दडून आहेत. लष्करी अधिकारी म्हणाले, एकदा सगळ्या आेजीडब्ल्यूला अटक झाल्यानंतर सगळे दहशतवादी एक आठवडाही टिकू शकणार नाहीत. अटकेच्या कारवायांमुळेच ९५ टक्के मोहिमा जंगलात होत आहेत. कारण स्थानिक लोक दहशतवाद्यांना मुळीच आश्रय देत नाहीत. गांदरबल येथील हत्या प्रकरणात जुनैद बटला ठार केले गेले. आश्रय नाही..९५% चकमकी जंगलात श्रीनगर| काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा प्रचार करण्यासाठी आलेल्या हिज्बुल मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. त्यात दोन जवानही जखमी झाले. कुलगामच्या बेहीबागमध्ये गुरुवारी पहाटे ही घटना घडली. दहशतवाद्यांच्या शोधात उशिरा रात्री तपास अभियान हाती घेतले होते. दहशतवाद्यांत हिज्बुल कमांडर फारुक अहमद बट ऊर्फ नालीदेखील संबोधले जाते. तो २०१५ पासून सक्रिय होता. त्याच्यावर ३७ गुन्हे आहेत. नोव्हेंबरमध्येही ८ अतिरेकी ठार झाले.

Share