महायुतीचे आमदार, मंत्री संघ मुख्यालयात:मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदेसह सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती; अजित पवार मात्र, अनुपस्थित

विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीचे आमदार व मंत्र्यांना रेशीमबागेतील संघ मुख्यालयात निमंत्रित केले होते. त्यामुनसार सकाळी स्मृतिमंदिरस्थळी आयोजित संघ परिचय वर्गात युतीच्या आमदारांना हजेरी लावली. संघाचे विदर्भ प्रांत संघचालक श्रीधर गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. मात्र, मागील वर्षी प्रमाणे अजित पवार यांनी या वेर्षी देखील संघ मुख्यालयात भेट देणे टाळले आहे.
या वेळी सर्व आमदारांना संघातर्फे सुरू असलेल्या विविध सेवाकार्यांबाबत ते माहिती दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, पंकज भोयर, चित्रा वाघ, जयकुमार रावल, श्रीकांत भारतीय, शिवेंद्रराजे भोसले, संजय राठोड, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे, नीलेश राणे, राम शिंदे, प्रवीण दरेकर, नितेश राणे यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे आमदार स्मृती स्थळाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप आणि सहयोगी पक्षाचे आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देतात. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांचे आमदारांना देखील संघाकडून निमंत्रण देण्यात आले आहे. गेल्या वर्षी देखील महायुतीच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. मात्र अजित पवार अनुपस्थित होते. यावर्षी देखील अजित पवार आले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या सर्व घटना घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमकी परंपरा काय? संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे येथे स्मृतीस्थान आहे. या स्मृती स्थळाचे दर्शन सर्व आमदार घेत असतात. तसेच यावेळी संघाचे पदाधिकारी आमदारांना संघाच्या कार्याची माहिती देऊन बौद्धिक मार्गदर्शन देखील करतात. ही दरवर्षी परंपरेप्रमाणे चालू आलेली प्रथा आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान सर्व आमदार येथे भेट देतात.

  

Share