राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने निर्णय मागे घेतला. या निर्णयानंतर आता ठाकरे बंधूंचा विजयी झाला.मराठी माणसाच्या या दबावामुळे विजय मिळाल्याचे म्हणत दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच विजयी मेळाव्या निमित्तने 18 वर्षानंतर एका व्यासपीठावर आले.