सैफ अली खानवरील हल्ल्यामागे चोरी एकमेव हेतू:अंडरवर्ल्ड टोळीचा हात नाही : गृह राज्यमंत्री योगेश कदम, म्हणाले – मागणी केल्यास सुरक्षा देऊ

बॉलिवूड स्टार सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामागील कारणाबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये झालेल्या हल्ल्यामागे केवळी चोरीचा हेतू होता, अशी माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी दिली. या हल्ल्यामागे कोणत्याही अंडरवर्ल्ड टोळीचा हात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सैफ अली खानच्या वांद्रे येथील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मानेसह अनेक ठिकाणी वार करण्यात आले होते, त्यानंतर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. योगेश कदम यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सैफ अली खानवरील हल्ल्यावर प्रतिक्रिया देत माहिती दिली. गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, या हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ज्याचा चेहरा संशयित हल्लेखोराशी जुळतो. तो इमारतीतून पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्या व्यक्तीचा गुन्हेगारी रेकॉर्ड असून पोलिस त्याची चौकशी करत आहेत. मागणी केल्यास सुरक्षा देण्याचा विचार करू
या हल्ल्यात कोणत्याही गुन्हेगारी टोळीचा सहभाग असल्याबद्दल विचारले असता, प्राथमिक तपासात असा कोणताही अँगल असण्याची शक्यता नाकारली गेली आहे. या घटनेमागे आतापर्यंत चोरीचाच हेतू होता. सैफ अली खान यांना धमकी आली असल्याचा उल्लेख केला नाही. कधी धमकी आली नाही, विरोधी पक्षाने वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. सैफ अली खान यांनी मागणी केली, तर सुरक्षा देण्यासाठी विचार केला जाईल, असेही योगेश कदम यांनी सांगितले. शाहरुख खान याच्या घराच्या रेकीबद्दल बोलताना योगेश कदम हे म्हणाले की, शाहरुख खान याच्या घराची रेकी केली गेली, अशी कोणतीही माहिती ही प्रशासनाकडे नाही. हे ही वाचा सैफवरील हल्ल्यातील संशयित ताब्यात:वांद्रे स्टेशनवरील CCTVमध्ये दिसला होता; बुधवारी रात्री अभिनेत्यावर घरात घुसून चाकूने केले वार अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला केल्याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिस संशयिताची सुमारे 3 तासांपासून चौकशी करत आहेत. या प्रकरणात, गुरुवारी एका संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले, जो 15 जानेवारी रोजी पहाटे 2.30 वाजता सैफच्या घरात दिसला होता. यानंतर, आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले ज्यामध्ये वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ एक संशयित दिसला. दोन्ही संशयित एकच आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सविस्तर वाचा…

  

Share