माहीम मतदारसंघात सभा घेण्याची गरज नाही:हा माझा मतदारसंघ, मुंबईकरांचा मला पाठिंबा- उद्धव ठाकरे
माहीम मतदारसंघात सभा घेण्याची मला आवश्यकता नाही. माहीम हा मतदारसंघ माझा आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. तसे पाहायचे झाले तर मुंबईत काल एक सभा झाली. 17 तारखेलाही सभा आहे. मी सध्या मुंबईच्या बाहेरच आहे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, एकीकडे गेलो आणि एकीकडे गेलो नाही, म्हणजे मी एका बाजूने लक्ष देतोय आणि दुसरीकडे दुर्लक्ष करतोय, असा त्याचा अर्थ होत नाही. मुंबईकरांचा मला पाठिंबा आहे, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. शिंदेंनी केवळ गद्दारांना नोकऱ्या दिल्या उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात बेरोजगारीने कळस गाठला आहे. पण सध्याचे शिंदे सरकारच्या कारभारात याविषयीची कोणतीही तरतूद दिसत नाही. त्यांनी केवळ गद्दारांना नोकऱ्यांना दिल्या. सर्वसामान्य जनतेला काहीच दिले नाही. पण आमचे सरकार महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना, मुला-मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देईल. या सरकारने मुंबईतील वित्तीय केंद्र गुजरातला पळवून लावले. पण आम्ही हे केंद्र धारावीत उभे करून तेथील जनतेला रोजगार उपलब्ध करून देऊ. दुरंगी लढतीत अमित ठाकरेंच्या विजयाची शक्यता कमी:पण तिरंगी लढतीत आम्हा दौघांपैकी एकाला संधी, एकनाथ शिंदे यांचा दावा मनसेचे आणि आमच्यामध्ये भांडूप मतदारसंघासाठी बोलणं झाले होते. अमित ठाकरे त्या मतदारसंघातून लढतील असे आम्हाला सांगण्यात आले होते, त्यानुसार आम्ही तयारी केली. पण अमित ठाकरे अचानक माहीममधून उभे राहिले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही बाळा नांदगावकर यांच्या मतदारसंघात महायुतीम्हणून उमेदवार दिला नाही. राज ठाकरे यांनी अमित यांना माहीममधून उमेदवारी दिल्यावर सदा सरवणकर यांच्याशी चर्चा केली. पण जर माहीममध्ये दुरंगी लढत झाली तर अमित ठाकरेंचा पराभव होऊ शकेल, अन् तिरंगी लढत झाल्यास मात्र आम्हा दोघांपैकी एकाला संधी आहे, हे समीकरण राज ठाकरेंना सांवागे असे सरवणकरांना म्हणालो पण राज ठाकरे त्यांना भेटले नाही. वाचा सविस्तर