महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता:किमान तापमान 8 ते 14 अंशापर्यंत जाणार, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या हाडे गोठवणारी थंडीला सुरुवात झाली असल्याचे जाणवत आहे. तसेच यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाच्या नोंदीना सुरुवात झाली आहे. राज्यात थंडीची लाट येण्यास पोषक वातावरण असल्याचे IMD ने सांगितले आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी याबाबत एक्सवर माहिती देत तापमानात अधिक घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, किमान तापमानाचा घसरण्याची शक्यता वाढली असून कोकण, मध्य महाराष्ट्र वगळता येत्या 24 तासांत किमान तापमान 8 ते 14 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील तापमान हे 11 ते 14 अंशांपर्यंत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 1 ते 2 अंशांनी तापमान वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उत्तरेकडील राज्यांनंतर आता महाराष्ट्रात काही भागात थंडीच्या लांटेला सुरुवात होणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 15 ते 16 म्हणजे थंडीची लाट असून पहाटे धुक्याची चादर व तापमानात नीचांक राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात काही भागांमध्ये गारठा वाढला आहे. विदर्भातही बहुतांश ठिकाणी पारा घसरला असल्याचे दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी एक्सवर माहिती देताना म्हंटले की, राज्याच्या अंतर्गत भागात सध्या अनेक ठिकाणी तापमान 11 ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. किमान तापममान आणखी खाली जाऊ शकते. पहाटे पहाटे तापमान पाहा, विशेषतः जे त्यांच्या कामासाठी बाहेर असतील. काळजी घ्या. काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता IMD ने आधीच दर्शवली आहे.

  

Share