मशिदी पाडणार आणि मंदिरे वाचवणार:एकही हनुमान मंदिर पडणार नाही, हा हिंदूंना शब्द; प्रसाद लाड यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

भाजप सरकार दादर मधील हनुमान मंदिर पडायला निघाले आहे, रेल्वे खात्याकडून मंदिर पाडण्याचा फतवा काढण्यात आल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. त्यांच्या या विधानावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकही मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पडणार नाही. हा हिंदूंना शब्द आहे, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत. तसेच मशिदी पाडणार आणि मंदिरे वाचवणार असेही विधान लाड यांनी केले आहे. प्रसाद लाड म्हणाले, एकही मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडले जाणार नाही, हा हिंदूंना शब्द आहे. अनधिकृत मशिदीवरचा विषय नीतेश राणे आणि मी उचलला आहे. मुंबईतील 12 मशिदी पाडण्यासाठी आम्ही नोटीस दिली असल्याचे देखील प्रसाद लाड यांनी यावेळी सांगितले आहे. उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका करताना प्रसाद लाड म्हणाले, उद्धव ठाकरे यांना मस्जिद वाल्यांची बाजू घ्यायची आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही मस्जिद पाडणार आणि मंदिरे वाचवणार हे निश्चित, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या या विधानावर काय प्रतिक्रिया उमटतात याकडे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, भाजप नेत्या नवनीत राणा यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नवनीत राणा म्हणाल्या, हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकवू नये. हनुमान चालीसाचा विरोध करणारे, हनुमान चालीसा म्हणणे म्हणजे राजद्रोह दाखल करून जेलमध्ये टाकणारे. अशा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना हिंदूंवर अत्याचार केले. त्यामुळे उद्धवनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्व हे सत्तेसाठी खुटींवर टांगणारे तुमची, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींवर बोलायची लायकी नाही, अशा शब्दात नवनीत राणा यांनी हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हल्ले होत आहेत. त्यासंदर्भात मोदी सरकार काय पावले उचलत आहे? यासाठी आमच्या खासदारांनी त्यांच्या भेटीची वेळ मागितली. परंतु ती मिळाली नाही. दुसरीकडे मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर 80 वर्षांपासून जुने हनुमानाचे मंदिर आहे. रेल्वेतील हमालांनी बांधलेले हे हनुमानाचे मंदिर आहे. त्याला पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस पाठवली आहे. मग कुठे आहे तुमचे हिंदुत्व?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजप तसेच महायुतीला विचारला आहे.

  

Share