पंजाबमध्ये तीन मजली इमारत कोसळली:इमारतीत जीम सुरू होती, 15 जण अडकल्याची भीती; शेजारील तळघर खोदल्यामुळे घडली दुर्घटना
पंजाबमधील मोहाली येथे शनिवारी तीन मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 15 जण दबले गेल्याची शक्यता आहे. पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या इमारतीत एक जिम सुरू होती. त्या इमारतीच्या पुढे तळघराचे खोदकाम चालू होते. त्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत होऊन ती कोसळली. इमारत कोसळली त्यावेळी जिम सुरू असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत जिममध्ये व्यायाम करण्यासाठी आलेले लोक ढिगाऱ्याखाली दबले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप औपचारिकपणे काहीही समोर आलेले नाही. जिमची खरी स्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासन जिम व्यवस्थापकांशी संपर्क साधत आहे. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, ढिगाऱ्याखाली 10 ते 50 लोक गाडले गेल्याची भीती आहे. 3 मजली इमारत कोसळल्याची छायाचित्रे…