नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस:महाविकास आघाडीचे पायऱ्यांवर आंदोलन तर महायुतीच्या सर्व आमदारांचे फोटोसेशन
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि परभणी प्रकरणावर आज अधिवेशनात चर्चा होणार आहे. यातच विधान परिषद सभापती पदाची आज घोषणा देखील आज होईल. सभापती पदासाठी एकच अर्ज आल्याने भाजपचे राम शिंदे यांची बिनविरोध सभापतीपदी नेमणूक होणार आहे.