उद्धव आणि राज ठाकरे दोघेही राजकीय अनफिट:संदीप देशपांडेंमध्ये मंत्री होण्याची क्षमता, गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे युती करणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. राज ठाकरे एका मुलाखतीत बोलताना म्हणाले होते, महाराष्ट्राचे कल्याण होणार असेल तर कौटुंबिक भांडणासारख्या क्षुल्लक गोष्टी मी विसरून पुढे जाईल, असे म्हटले होते. तसेच यावर उद्धव ठाकरे यांनी देखील भांडण बाजूला ठेवायला तयार असल्याचे भाषणात म्हटले होते. यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येणे सुरू झाले आहे. यात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील आपले मत मांडले आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, सबकुछ फिल्मी हैं, स्वत: प्रोडक्शन काढणे आणि महेश मांजरेकरांना डायरेक्टर करणे, हे सगळे फुल टू फिल्मी आहे. हा ड्रामा सिरिअस सुद्धा मी म्हणणार नाही. दोन्ही राजकीय पक्षांचे काय अस्तित्व आहे. राज ठाकरेंची लोक विधानसभा आणि लोकसभेत आहे का? एक दोन इव्हेंट ते घेतात. उद्धव ठाकरे मामूजान, भाईजान करतात, किती त्यांना समजले आणि किती न्याय हक्कासाठी ते उभे राहातात सर्वांना माहिती आहे. वक्फमुळे लोकांना त्रास होतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही किरकोळ, काय होलसेल दुकान उघडणार आहे का? कोणता ब्रॅंड? चिन्ह टिकू शकते का? किती मते आहेत? असे सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे संभाव्य युतीवर प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देणे टाळले होते. यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांची बोलकी प्रतिक्रिया आहे. कामाचे बोल, यांच्यावर टाइम घालवणे चुकीचे आहे. हे करमणूक करणारे आहेत. बँक आंदोलन मागे घ्यावे लागले, हिंदी भाषा सक्तीविरोधात बोलले. तालिबानी देश नाही आहे. राज ठाकरेंनी स्वतः 2008 साली बोलले होते की हिंदी राजभाषा आहे. राज ठाकरेंचे हे आंदोलन फेल जाणार. अशात नवीन प्रॉडक्ट महेश मांजरेकर यांना मार्केटमध्ये आणून चालेल का? म्हणून आणले असेल. राज आणि उद्धव ठाकरेंना पॉलिटिकल सायकॉलॉजिस्टची गरज गुणरत्न सदावर्ते म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सोयाबीन आणि शेतीवर बोलून दाखवावं, लोकांना गोष्टी समजल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना पॉलिटिकल सायकॉलॉजिस्टची गरज आहे. हे राजकीय वेडेपण आहे, काय करु, काय करु, कसे करु, कसे करु यांचे सुरु आहे. हे दोघेही राजकीय अनफिट आहेत. संदीप देशपांडे राइट पर्सन ऑन रॉन्ग प्लेस आहे संदीप देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवले आहे. हिंदीसक्तीच्या विरोधात हे पत्र त्यांनी पाठवले आहे. यावर प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, संदीप देशपांडे यांनी काही पत्र व्यवहार केला असेल तर ते त्यांना अधिकार आहेत. संदीप चिंतनीय माणूस आहेत. तो राइट पर्सन ऑन रॉन्ग प्लेस आहे. मंत्री होण्याची क्षमता असेला माणूस आहे. राज ठाकरेंना जे सुचले नाही, ते संदीप देशपांडे यांना सुचले, असेही सदावर्ते म्हणाले.

  

Share