उद्धव ठाकरे- एकनाथ शिदेंचा एकाच वेळी दौरा योगायोग नाही:शिंदेंची लाचारी तर ठाकरेंची राहुल गांधींसोबत बैठक; राऊतांचा दावा उद्धव ठाकरे- एकनाथ शिदेंचा एकाच वेळी दौरा योगायोग नाही:शिंदेंची लाचारी तर ठाकरेंची राहुल गांधींसोबत बैठक; राऊतांचा दावा

उद्धव ठाकरे- एकनाथ शिदेंचा एकाच वेळी दौरा योगायोग नाही:शिंदेंची लाचारी तर ठाकरेंची राहुल गांधींसोबत बैठक; राऊतांचा दावा

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच वेळी दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. याला योगायोग समजण्याचे काही कारण नाही. एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा त्यांची लाचारी आहे. त्यांच्या पक्ष प्रमुखांना भेटण्यासाठी त्यांना यावे लागते. तर उद्धव ठाकरे यांच्या राहुल गांधी आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांसोबत काही महत्त्वाच्या बैठका आहेत. त्यामुळे ते दिल्लीत येत असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अमित शहा आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये असल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खास करून शिंदेंना वारंवार इथे येऊन बसावेच लागते. यात नवीन काही नाही. त्यांच्या पक्षाचे मुख्यालय दिल्लीत आहे. त्यामुळे शिंदे जर आले असतील तर तो उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी त्याचा योगायोग समजण्याचे कारण नाही. त्यांना दिल्लीत थांबावेच लागते. राज्यातील इतर भाजपच्या नेत्यांना हाय कमांडला भेटण्यासाठी दिल्लीत थांबावे लागते, तसेच शिंदे यांना देखील थांबावे लागते, असा आरोप राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे हे दोन ते तीन दिवसांसाठी दिल्लीत येत आहेत. राहुल गांधी यांच्या सोबत त्यांची बैठक आहे. इंडिया आघाडीची बैठक आहे. त्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. आज शिवसेनेच्या खासदारांची देखील महत्त्वाची बैठक होणार आहे. ते शरद पवार यांना देखील भेटण्याची शक्यता आहे. अशा त्यांच्या ठरलेल्या बैठका असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. खूप मोठे काही होणार मात्र, महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे काही घडण्यासारखी मोठी माणसे राज्यात सत्तेवर बसलेली नाहीत. आपल्या राज्याला महान माणसे सत्तेमध्ये देण्याची परंपरा होती. मात्र भारतीय जनता पक्षामुळे ती परंपरा खंडित पावली आहे. त्यामुळे सध्या खुजे लोक सरकारमध्ये येऊन बसले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या महान परंपरेला ग्रहण लागले आहे. दिल्ली पुढे येऊन झुकायचे आणि वाकायचे, एवढेच काम सध्या सुरू आहे. तुम्ही म्हणाल की, उद्धव ठाकरे देखील दिल्लीत येत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे येत आहेत ते दिल्ली या देशाची राजधानी आहे. विरोधी पक्षाचे राजकारण दिल्लीतून चालते. खूप मोठे काही होणार आहे, मात्र ते महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तुम्ही निवडणुकाच कशाला घेता? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर होईल मात्र व्हीव्हीपॅड मशीन लागणार नसल्याचे निवडणूक आयोग सांगत आहे. यामुळे कोणाला मत दिले तुम्हाला कळणार नाही. मग तुम्ही निवडणुकाच कशाला घेता? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. याचे कारण त्यांनी असे दिले आहे की, निवडणुकीच्या मतमोजणीला आणि निवडणूक प्रक्रियेत उशीर होतो. मोदी डिजिटल इंडियाचा नारा देतात? मात्र, अशा पद्धतीने उशीर होत असेल तर तुम्ही मतपत्रिकेवर निवडणूक घ्या. या निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रणा या मध्य प्रदेशातून आणणार आहेत. याच मध्य प्रदेश मध्ये सर्वात मोठा ईव्हीएम घोटाळा झाला होता. तेच ईव्हीएम महाराष्ट्रात आणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अमित शहा आणि निवडणूक आयोगाने ठरवलेले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *