यूपीतील प्रियंका दुबे आणि प्रियांशी सिंह या महिला कॉन्स्टेबलनी ग्रामीण महिलांना जागरूक करून सायबर फसवणुकीच्या घटना रोखल्या आहेत. या दोघींनी प्रयागराज जिल्ह्यात ‘सायबर दीदी मोहीम’ सुरू केली. २०११ च्या तुकडीच्या प्रियंका दुबे २०२२ पासून सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक करत आहेत. ग्रामीण भागातील महिला वेगाने स्मार्टफोन आणि इंटरनेटशी जोडल्या जात आहेत, पण त्या सहज सायबर फसवणूक,ऑनलाइन छळाच्या बळी ठरत असल्याचे लक्षात आले तेव्हा डिजिटल जागरूकता मोहीमही सुरू केली. त्यांच्याच ठाण्यात तैनात प्रियांशी सिंह या महिला कॉन्स्टेबलने त्यांना साथ दिली. या दोघी प्रयागराजमध्ये ‘सायबर दीदींची जोडी’ म्हणून परिचित आहेत. १०० पेक्षा जास्त गावांतील चावड्या, शाळा-कॉलेज,अंगणवाडी केंद्रे,सभांत जाऊन सायबर फ्रॉडबाबत जागरूक केले. त्यांच्या प्रयत्नामुळे १०० वर तक्रारी वेळीच नोंदल्या गेल्या. लाखो रुपयांची फसवणूक थांबली.


By
mahahunt
7 July 2025