यूपीत 4 दिवसांनी विद्यार्थ्यांचा पहिला विजय:भरती परीक्षा नियमात बदल, पीसीएस, आरओ पुढे ढकलली

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (यूपीपीएससी) चार दिवसांपासून आंदाेलन करणाऱ्या १५-२० हजार विद्यार्थ्यांची मागणी अर्धवट का होईना मान्य केली. पीसीएस (प्राथमिक) परीक्षेला एका दिवसात एक सत्रात घेण्यासाठी आयोगाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. समीक्षा अधिकारी व सहायक समीक्षा अधिकारी (आरआे-एआरआे) परीक्षा पुढे ढकलताना आयोगाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर मात्र विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. आरआे-एआरआे परीक्षादेखील एका दिवसात घेण्याचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. या परीक्षेत १०.७६ लाख विद्यार्थी सहभागी आहेत. पीसीएस परीक्षा ५.७६ लाख विद्यार्थी देणार आहेत. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आयोगाचा निर्णय म्हणजे आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा डाव मानतात. आधी पीसीएस (प्राथमिक) परीक्षा दोन दिवस घेण्याचा निर्णय केला गेला. परंतु परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन आयोगाने ती एक दिवसात पार पाडण्याचा निर्णय तत्त्वत: मान्य केला आहे. आयोगाच्या निर्णयावर विद्यार्थी समाधानी नाहीत. आम्हाला दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत. सरकार दोन परीक्षांबाबत वेगवेगळे निर्णय का घेत आहे? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला. लोकसभा निवडणुकीपूर्वी एआरआेची परीक्षा झाली होती. परंतु पेपरफुटी झाल्याने ती रद्द झाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने एक समिती स्थापन करून परीक्षा आयोजनाची नियमावली तयार केली. त्यात एकावेळी पाच लाख विद्यार्थी परीक्षेत सहभागी करण्याचा निर्णय झाला. आरआे-एआरआे परीक्षेत १० लाखांहून विद्यार्थी सहभागी होतील. त्यामुळे ही परीक्षा तीन टप्प्यात घेण्याचे ठरले. त्यास विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
निर्णयाची कहाणी… सकाळी १० वाजता मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचा अध्यक्षांना फोन, नंतर निर्णय जाहीर उत्तर प्रदेशात ९ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होईल. विद्यार्थी आंदोलनाचा निवडणुकीला फटका बसेल, अशी भीती भाजप प्रदेश शाखेला वाटते. लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिस व आरआे एआरआेची भरती परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाली होती. त्याचा फटका बसेल, असे पक्षाला वाटते. सकाळी १० च्या सुमारास मुख्यमंत्री योगींनी अधिकाऱ्यांसमवेत बैठकीतून आयोगाच्या अध्यक्षांना फोनवरून सूचना केल्या. नंतर दुपारी १२ वाजता अध्यक्षांनी हा निर्णय जाहीर केला. सामान्यीकरण म्हणजे काय? विद्यार्थ्यांचा विरोध का? ‘नॉर्मलायझेशन’ला विद्यार्थ्यांनी विरोध केला. बैठकीनंतर समिती स्थापन करण्याचे ठरले. सामान्यीकरणानुसार एकापेक्षा जास्त सत्रांत परीक्षा झाल्यास प्रत्येक सत्रातील कमाल गुणांचे रूपांतर सरासरी गुणांत होते. पीसीएस एक दिवस-एका सत्रात होणार बॅरिकेडिंग तोडले; गुरुवारी सकाळी सहा वाजता पोलिसांनी विद्यार्थी व आयोगादरम्यान बॅरिकेडिंग लावले. मोठा बंदोबस्त पाहून विद्यार्थ्यांचा मोठा जमाव त्या दिशेने चालून आला. त्याने बॅरिकेडिंग तोडले. या वेळी फुलपूरमध्ये प्रचारासाठी आलेले अखिलेश यादव म्हणाले, विद्यार्थी आंदोलनास माझा पाठिंबा आहे. परंतु तेथे जाऊन राजकारण करू इच्छित नाही. ते आंदोलनस्थळी भेट देतील, असा पोलिसांचा अंदाज होता.

Share