संपूर्ण देशात मान्सूनने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे उत्तराखंडमधील चार धाम यात्रा पुढील २४ तासांसाठी स्थगित करण्यात आली आहे. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जमुआ घाट पूल कोसळला. त्याच वेळी, भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) आज केरळच्या किनारी भागात २ ते ३ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. १५ चित्रांमध्ये पावसाचा कहर… हिमाचल प्रदेश उत्तराखंड राजस्थान ओडिशा


By
mahahunt
29 June 2025