वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा:रोहिणी खडसे यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी; ‘पॉलिटिकल नेक्सस’चा आरोप

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात मोठे पॉलिटिकल नेक्सस झाले होते. त्यामुळे हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्यात आला होता. सी-आयडीच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे पुढे आले होते. त्यामुळे आता वैष्णवी हगवणे प्रकरण देखील सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे. या संदर्भात रोहिणी खडसे यांनी सोशल मिडीया वर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वैष्णवी हगवणे प्रकरणातील तपासा सीआयडी कडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील मोठे पॉलिटिकल नेक्सस समोर आले होते. त्यामुळे त्याचा तपास पारदर्शक होत नव्हता. हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग केले असता सीआयडी तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. तसेच वैष्णवी हगवणे प्रकरणात देखील मोठे पॉलिटिकल नेक्सस आहे. त्यामुळे हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आरोपींच्या बचावासाठी काही हात सरसावत आहेत अशी शंका सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात मोठे पॉलिटिकल नेक्सस होते. त्यामुळे तपास पारदर्शक होत नव्हता. ज्यावेळी प्रकरण सीआयडी कडे गेले त्यावेळी अनेक धक्कादायक खुलासे सीआयडी तपासातून पुढे आले. वैष्णवी हगवणे प्रकरणातही मोठे पॉलिटिकल नेक्सस आहे. त्या आरोपींच्या बचावासाठी काही हात सरसावत आहेत अशी शंका येते. माझी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणही सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा. आरोपी शशांक आणि सुशीलवर आणखी एक गुन्हा वैष्णवी हगवणे हुंडाबळी आणि आत्महत्या प्रकरणातील आरोपी शशांक आणि सुशील हगवणे यांना शस्त्र परवाने दिल्याच्या आरोपाखाली पुण्यातील विशेष महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर यांची चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे मंजूर करून परवाने देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केली असून दरम्यान गृह विभागाने गुरुवारी सुपेकर यांच्यावरील अतिरिक्त कारभार काढून घेण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी आरोपी शशांक आणि सुशील हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

  

Share