यंदाच्यावर्षी सर्वदूर चांगला पाऊस चांगला झाल्यामुळे सर्वत्र चैतन्यदायक वातावरण असून सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची संख्या अधिक आहे. यावर्षी सोहळ्यामध्ये सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने काही बदल केले आहेत. यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाच्या दोन्ही चाकांच्या मध्ये जाळी बांधलेली आहे. त्यामुळे दर्शन घेत असताना, यापूर्वी काही छोटे अपघात घडले, ते यावेळी अत्तापर्यंत कुठेही घडले नाही. तसेच, पालखी रथामध्ये ठेवण्याची जागा थोडी खाली घेतली आहे, त्यामुळे रथ जात असताना पायी जाणाऱ्यांना सहज दर्शन घेता यावे, यासाठी तो बदल करण्यात आला आहे. पूर्वी रथातील पालखी, पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना उडी मारुन घ्यावे लागत होते, त्यातून किरकोळ अपघात घडले होते. नवीन बदलांमुळे भाविकांना दर्शन घेणे सुखकर झाले आहे. दररोज पहाटे, स्थानिक पोलिसांशी संवाद करून वाहतुकीच्या नियोजनासह, कुठे गर्दी होण्याची शक्यता असते, त्या ठिकाणच्या पर्यायी उपाययोजनांबाबत चर्चा करून त्याचे समन्वय करण्यात येते. महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएसचे) स्वयंसेवकांचे पाच पथक सोबत आहेत. त्यापैकी एक तुकडे पालखी रथाच्या सोबत पोलिसमित्र म्हणून काम पाहिते. एक तुकडी विसावा, एक जेवणाच्या ठिकाणी जाते व एक पाठीमागील दिंड्यासह, वाहनांचे नियंत्रण पोलिसांच्या मदतीने करत आहे. पालखी रथाच्या समवेत, वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे, आमच्या पर्यंत येणाऱ्या सूचना त्वरीत संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवतो, लगेच त्यावर मार्ग काढण्यात येतो. यंदाच्या सोहळ्यात वेळेच खूप अचूक नियोजन सुरु आहे. चोपदार मंडळी, स्वयंसेवक, पोलिसांच्या मदतीने ती यंत्रणा सुखकर पद्धतीने हाताळण्यात येत आहे. दिंड्यामध्ये पडणारे अंतर कमी करण्यात येत आहे. त्यामुळे रात्री आठ, साडेआठ वाजता होणारी तळावरची आरती यावेळी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेपर्यंत होत आहे. व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून छोटं-छोटे बदल केले असल्याने त्याचा चांगला परिणाम यावेळी दिसत आहे. दिंड्यांच्या मार्गावर स्पिकरला बंदी घालण्यात आली आहे. कारण, त्या आवाजामुळे दिंडीतील वारकऱ्यांना भजन करणाऱ्यांसाठी त्रास होतोय, त्यामुळे काही ठिकाणी सक्तीने बंदी केली, तर काही ठिकाणी आवाहनद्वारे स्पिकर्स बंद केले आहेत, त्यामुळे सर्वांना व्यवस्थित भजन करता येत आहे. तसेच, आम्हाला नियोजनासाठी संवाद करता येत आहे.