पुण्यात आचारसंहिता भंगाच्या दोन वेगवेगळ्या घटना:वाहनावर पक्षाचे लावणाऱ्या दोन कारचालकांवर गुन्हा दाखल

मानस सोसायटी ते क्रिस्टल कॅटल सोसायटी रस्ता कॉक्रीटीकरण करणे चालु आहे. नागरिकांना होणार्‍या तसदी बद्दल क्षमस्व म्हणत भारतीय जनता पार्टीचे खडकवासाला मतदार संघाचे उमेदवार भिमराव आण्णा तापकीय यांच्या विकास निधीतून अशा आशयाचा फलक लावण्यात आला होता. खाली सौजन्य म्हणून सारंग भोसले असे नाव लिहण्यात आले होते. हा सर्व प्रकार आचारसंहितेचा भंग ठरत असल्याने याप्रकरणी अज्ञातावर आचार संहिता भंग प्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनुराग राजेशकुमार यांनी फिर्याद दिली आहे. तर दुसर्‍या गुन्ह्यात कोणतीही परवानगी न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे उमेदवार मयुरेश वांजळे यांच्या प्रचार कार्यालयामोर गाड्या उभया होत्या. त्या गाड्यावर मागील व पुढील बाजुस अवैधरित्या विना परवानगी पक्षाचे चिन्ह व नाव फोटो लावले होते. या प्रकरणात आचारसंहितेचा भंग झालेल्या दोन कार चालकांवर सिंहगडरोड पोलिस ठाण्यात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वीर बाजी पासलकर चौक येथे निदर्शनास आला. जुगार अड्ड्यावर छापा, सात जणांवर गुन्हा दाखल पुणे शहरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले असताना हडपसर येथील मांजरी परिसरात राजरोसपणे बेकायदेशिररित्या जुगार खेळणार्‍यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यावेळी सात जणांवर गुन्हा दाखल करत त्यांच्यावर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय कामठे, गुंडेराव शिंदे, महेश यादव, मुन्ना पठाण, गणेश चांदणे, महेश भोसले आणि वामन जाधव अशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतले. मांजरी येथील ग्रीन पार्कच्या पाठीमागे नाल्याच्या कडेला झाडा झुडपाच्या आतमध्ये मोकळ्या जागेत बेकायदेशिर जुगार खेळला जात असल्याचा प्रकार आता समोर आला आहे.या कारवाईमुळे शहरात अजूनही छुप्या पध्दतीने असे अवैध धंदे सुरू असल्याचे या कारवाईवरून स्पष्ठ झाले आहे. आयुक्तांच्या आदेशाला काही ठिकाणी गांभिर्याने घेतले का नाही असा प्रश्न या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

  

Share