राज्यात 2.26 लाख मतदान यंत्रावर होणार मतदान:9.70 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क, 1 लाख 186 मतदान केंद्र

राज्यात विधानसभा निवडणुकीत 2.26 लाख मतदान यंत्रावर मतदान होणार असून 1 लाख 186 मतदान केंद्रावर 9.70 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात विधानसभा निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी इलेक्ट्राॅ्निक मतदान यंत्र सज्ज केले जात असून प्रत्यक्ष मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यभरात 1 लाख 186 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून यामध्ये शहरी भागात 42604 तर ग्रामीण भागात 57582 मतदान केंद्राचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर राज्यभरातील 9.70 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी 2 लाख 26624 मतदान यंत्र लागणार असून 1 लाख 26 हजार 911 कंट्रोल युनीटचा समावेश आहे. तसेच 1 लाख 37 हजार 119 व्हिव्हीपॅट उपलब्ध करण्यात आले आहेत. राज्यातील आवश्‍यत त्या मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी रॅम्प, तीन चाकी सायकल उपलब्ध करण्यात आली असून या शिवाय मतदारांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यावेळी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासनाकडून गाव पातळीवर जनजागृती केली जात आहे. दरम्यान, राज्यात 9.70 कोटी मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये 18 ते 19 वर्ष वयोगटातील 22 लाख 22 हजार 704 मतदार आहेत. 20 ते 29 वर्ष वयोगटातील 1 कोटी 88 लाख 45 हजार 5 मतदार, 30 ते 39 वर्ष वयोगटातील 2 कोटी 18 लाख 15 हजार 278 मतदार, 40 ते 49 वर्ष वयोगटातील 2 कोटी 7 लाख 30 हजार 598 मतदार, 50 ते 59 वर्ष वयोगटातील 1 कोटी 56 लाख 10 हजार 794 मतदार, 60 ते 69 वयोगटातील 99 लाख 18 हजार 520 मतदार, 70 ते 79 वयोगटातील 53 लाख 52 हजार 832 मतदार, 80 ते 89 वयोगटातील 20 लाख 33 हजार 958 मतदार, 90 ते 99 वयोगटातील 4 लाख 48 हजार 38 मतदार, 100 ते 109 वयोगटातील 47169, 110 ते 119 वयोगटातील 113 मतदार, 120 प्लस वयोगटातील 110 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये 5 कोटी 22 हजार 739 पुरुष मतदार असून 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदारांचा समावेश आहे.

  

Share