वारी सोहळ्यात समाज आरतीवेळी होते न्यायदान:शिस्तबद्ध, पावित्र्य जपत करण्यात येणारे अखंड नामस्मरण हेच समाज आरतीचे वैशिष्ट्य, पाहा PHOTO वारी सोहळ्यात समाज आरतीवेळी होते न्यायदान:शिस्तबद्ध, पावित्र्य जपत करण्यात येणारे अखंड नामस्मरण हेच समाज आरतीचे वैशिष्ट्य, पाहा PHOTO

वारी सोहळ्यात समाज आरतीवेळी होते न्यायदान:शिस्तबद्ध, पावित्र्य जपत करण्यात येणारे अखंड नामस्मरण हेच समाज आरतीचे वैशिष्ट्य, पाहा PHOTO

सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या कैवल्यमूर्ती माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात शिस्तबद्धता, पावित्र्य, एकमेकांबद्दलचा आदर जपण्यात येतो. पालखी सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी नातेपुते तळावर आल्यानंतर होणारी सामुदायिक समाज आरती हा भाविकांना ऊर्जा देणारा सोहळा असतो. सोमवारी नातेपुते येथे जिल्ह्यातील पहिला पालखी मुक्काम तळावर समाज आरतीत सहभागी होऊन टिपलेली निरीक्षणे. दिंडी सोहळ्यातील प्रत्येकालाच माऊलींची आरती करण्याची आस असते. पण, एवढ्या मोठ्या सोहळ्यात प्रत्येकालाच ती संधी मिळेल असे नाही. त्यामुळे सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी होणाऱ्या समाज आरतीत सहभागी होऊन वारकरी सेवेची संधी घेतात. यावेळी असणारे शिस्त, आपुलकी, आदर हे विशेष उल्लेखनीय असते. माऊलींची पालखी रथातून खांद्यावर घेऊन सेवक पालखी तळाच्या मध्यभागी आणतात. त्या दरम्यान पावल्या खेळण्यात येतात. सर्व दिंड्या अवतीभोवती गोलाकार उभ्या असतात. प्रामुख्याने मानाचा दिंड्या पुढच्या बाजूला असतात. या संपूर्ण वेळी पालखीतळावर माऊलीच्या नावांचा जय हो सुरू असतो. टाळ मृदंगाचा ताल टिपेला लागलेला असतो. पालखी समोर शितोळे सरकार, वासकर महाराज व आरफळकर मालक यांचे प्रतिनिधी असतात. त्यानंतर सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार यांनी हातातील चांदीचा दंड (चोप) वर करतात, त्यादरम्यान पालखीतळावरील हजारो वारकऱ्यांचा समुदाय क्षणभरात शांत झाला. त्या क्षणात शांततेद्वारे सोहळ्यातील शिस्त स्पष्ट झाली. समाज आरतीचे वैशिष्ट्य… हातातील चोप उंचावताच सर्वत्र शांतता पसरली. चोपदारांनी दिवसभर वाचाल मध्ये कोणत्या वस्तू हरवल्या, कोणत्या सापडल्या याची यादी वाचली. त्यानंतर उद्या सोहळ्याचे पहिले रिंगण पुरंदावडे येथे होणार असून त्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर उद्या सकाळी सोहळा 6 वाजता निघेल अशी घोषणा करताच आरती सुरू झाली. ‘आरती ज्ञानराजा.. महाकैवल्य तेजा’… या आरतीनंतर पालखी तळावरील समाज आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेली. आरती दरम्यान निरंजन नसते किंवा कापूरही पेटवला गेला नाही. मंत्रपुष्पांजली देखील नसते. शिस्तबद्ध, पावित्र्य जपत करण्यात येणारे अखंड नामस्मरण हेच समाज आरतीचे वैशिष्ट्य. वारी सोहळ्यात होते न्यायदान… दिवसभरातील वाटचालीत काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास समाज आरतीवेळी चोपदारांनी दंड वर केल्यानंतरही ज्या दिंडी वारकरी टाळ- मृदंग वाजवत राहतात, त्यांच्या तक्रारीची योग्य निरसन करून प्रसंगी आश्वासन दिल्यानंतर ते शांत होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखीचे प्रस्थान किती वाजता होणार आहे याची सूचना चोपदार देतात. तोपर्यंत त्यांच्या हातातील दंड वर असतो. तसेच, हरवलेल्या वस्तू सापडलेल्या वस्तूंच्या यादीचे वाचनही करण्यात येते. पालखीतळावरील कार्यालयात ओळख पटवून त्या वस्तू नेण्याचे आवाहन करण्यात आले.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *