जम्मू-काश्मीरमध्ये 1.25 लाख काश्मिरी पंडित मतदार:8 जागी पंडितांना महत्त्व, मात्र स्थानिक VS बाहेरील फाळणी

श्रीनगरचे डाऊनटाऊन. २०१९ च्या आधी काश्मीरमध्ये येथे दगडफेक व्हायची. जणू हिंसेचे केंद्र. मात्र, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतही येथील शांतता चकित करते. त्याचे मोठे कारण म्हणजे काश्मिरी पंडीत. खरे तर येथे ३ जागा आहेत. त्यापैकीच एक हब्बा, कदल. येथे ९२ हजार मतदार. त्यापैकी २५ हजार काश्मिरी पंडित. मात्र कुटुंबे केवळ १००. तेही या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतील. इतर मतदार जम्मू परिसरात वा दुसऱ्या राज्यांत स्थायिक झाले. ते तिथेच बनलेल्या मतदान बूथवरून हक्क बजावतील. हब्बा, कदलमध्ये कुठेही निवडणुकीचे बॅनर दिसत नाहीत ना पोस्टर. ढोल-नगारे तर लांबची गोष्ट. त्याचे कारण ७६ वर्षीय पंडित मकबूल भट यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही स्वप्नात जगणे सोडून दिले. राजकीय वादात ६ वर्षे लोटली. आम्ही जिथे होतो, तिथेच आहोत. सरकार आता काश्मिरी पंडितांचे स्थलांतर करत आहे. नोकरी आणि सुविधा प्रदान करत आहे. १९९० च्या हिंसेत काश्मीर न सोडलेल्यांचे मात्र कुणीच ऐकत नाही. भास्करने विचारले, निवडणुकीत स्थलांतरित आणि स्थानिक मुद्दा आहे का? भट म्हणाले, कोरोनानंतर तर हाच मुद्दा आहे.’ वीज-पाणी, रुग्णालय देणाऱ्यांना मतदान दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जागेवर ८ हजार पंडित मतदार. राजपोरात ९ हजार. राजपोरात दोन काश्मिरी पंडित मैदानात आहेत. अनंतनाग जिल्ह्यातील शंगुस मतदारसंघात १० हजार पंडित मतदार. येथील अनिल कौल यांनी सांगितले की, मुस्लिम आणि हिंदूंऐवजी वीज, पाणी, उत्तम आरोग्य सेवा हे मुद्दे महत्त्वाचे. कारण आम्ही त्यांच्याशिवाय जगत आहोत. पुलवामाचे जानकी नाथ सांगतात, ‘धर्माच्या आधारे मत देणार नाही. आमच्या गरजा पूर्ण करणाऱ्यांनाच मत देऊ.’ १४ पंडित उमेदवार, त्यात ६ हब्बा कदलमध्ये… निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत काश्मीरमध्ये १४ काश्मिरी पंडित उमेदवार (२०१४ मध्ये ८) रिंगणात आहेत. त्यातील ६ हब्बा कदलमध्ये. २५ सप्टेंबरला मतदान आहे. १९९० च्या आधी येथे पंडित आमदारच होता. मात्र दोन निवडणुकांपासून ही जागा नॅशनल कॉन्फरन्सकडे गेली. हब्बा कदलच्या पुढे आहे, मैसुमा. येथेही पंडित नाराज आहेत. येथेही काश्मीरच्या स्वातंत्र्याचे नारे घुमत. ४६ वर्षीय सुनैना पंडित सांगतात, ‘आम्ही शांततेत जगत आहोत, त्यामुळे निवडणुकीतही शांततेच्या वातावरणात सहभागी झालो.’ ‘पुनर्वसन’ ऐकत मुलांची मुलेही आता मोठी झाली १९९० च्या हिंसेत वाचलेल्या जानकी कौल सांगतात की, ‘आम्हाला पूर्ण सन्मानाने खोऱ्यात पुनर्वसन पाहिजे. सर्व पंडित कुटुंबे त्याची वाट पाहात आहेत. आताचे सर्वच उमेदवार आमच्या पुनर्वसनाचे आश्वासन देतात. मात्र ही आश्वासने ऐकत, ऐकत आमच्या मुलांची मुलेही आता मोठी झाली.’

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment