नांदेडमध्ये 10 लाख 20 हजाराचे राशनचे धान्य जप्त:पोलिसांच्या कारवाईने पुरवठा विभागातील अधिकार्यांचे धाबे दणाणले
नवीन मोंढा भागात १० लाख २० हजार रूपये किंमतीचे राशनचे धान्य असलेले पाच वाहने शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी (दि.२५) जप्त केले आहेत. सदरील धान्य राशनचे आहे का, याबाबतचा अहवाल पुरवठा विभागाकडून मागविण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे पुरवठा विभागातील अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात राशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशावरून अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सहायक पोलीस अधीक्षक किर्तीका मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. ए. तांदळे यांच्या पथकाने मोंढा भागातून धान्याचे पाच टेम्पो ताब्यात घेतले आहेत.
वाहण क्रमांक (एम.एच २६ सी.एच ९२९७) मध्ये तांदुळ एकुण ६५० पोते प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किंमत अंदाजे १००० रुपये असे एकुण ६ लाख ५० हजार रुपये व गाडीची किंमत अंदाजे २० लाख रुपये असा एकुण २६ लाख ५० हजार रुपये, वाहण क्रमांक (एम. एच २६ एच ८०७३) मध्ये तांदुळ एकुण १२० पोते प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किंमती अंदाजे एक हजार रुपये असे एकुण १ लाख २० हजार रुपये व गाडीची किंमत अंदाजे दहा लाख रुपये असा एकुण ११ लाख २० हजार रुपये, वाहण क्रमांक (एम. एच २६ ए.डी. १४५८) मध्ये तांदुळ एकुण १३० पोते प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किंमती अंदाजे एक हजार रुपये असे एकुण एक लाख ३० हजार रुपये व गाडीची किंमत अंदाजे १५ लाख रुपये असा एकुण १६ लाख ३० हजार रुपये, वाहण क्रमांक (एम.एच २६ ए.डी. ८०९६) मध्ये तांदुळ एकुण ६० पोते प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किंमती अंदाजे एक हजार रुपये असे एकुण ६० हजार रुपये व गाडीची किमंत अंदाजे ३ लाख रुपये असा एकुण ३ लाख ६० हजार रुपये, वाहण क्रमांक (एम.एच ४७ ए.एस.१७७१) मध्ये तांदुळ एकुण ६० पोते प्रत्येकी पोते वजन अंदाजे ५० किलो किंमती अंदाजे एक हजार रुपये असे एकुण ६० हजार रुपये व गाडीची किंमत अंदाजे ३ लाख रुपये असा एकुण ३ लाख ६० हजार रुपये जप्त करण्यात आले. तब्बल पाच वाहनातील एक हजार २० पोत्यांमधील दहा लाख २० हजार रूपयांचे धान्य व वाहन असा एकूण ६१ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील टेम्पोतील धान्य हे राशनचे आहे का, यासंदर्भात पुरवठा विभागाचा अहवाल मागविण्यात आला आहे.