पार्डी खुर्द येथे विजेच्या धक्याने १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू:गावावर पसरली शोककळा

पार्डी खुर्द येथे विजेच्या धक्याने १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू:गावावर पसरली शोककळा

वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे विजेच्या धक्याने १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. परिदी बंडू डाढाळे असे मुलीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे बंडू डाढाळे यांचे घर आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी परिदी ही घराच्या छतावर जात होती. यावेळी गॅलरीच्या खिडकीजवळ आली असताना तिचा वायरला हात लागला. यामुळे तिला विजेचा जोरदार धक्का बसला. यावेळी तिने मदतीसाठी आरडा ओरड केली. तिचा आवाज ऐकताच बंडू हे तिला वाचविण्यासाठी धावतच पायऱ्यावर आले. त्यांनी कपड्याच्या सहाय्याने तिला ओढून काढले. त्यानंतर तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार बापुराव बाभळे, बालाजी जोगदंड यांच्या पथकाने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात जाऊन चौकशी केली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत कुरुंदा पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. दरम्यान, मयत परिदी ही इयत्ता चौथी वर्गात शिक्षण घेत होती. अभ्यासात अतिशय हुशार असलेली परिदी शिक्षकांची लाडकी विद्यार्थीनी होती. तिच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. दुपारच्या वेळी मृतदेहावर पार्डी खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तिच्या पश्‍चात आई, वडिल, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.

​वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे विजेच्या धक्याने १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. परिदी बंडू डाढाळे असे मुलीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे बंडू डाढाळे यांचे घर आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी परिदी ही घराच्या छतावर जात होती. यावेळी गॅलरीच्या खिडकीजवळ आली असताना तिचा वायरला हात लागला. यामुळे तिला विजेचा जोरदार धक्का बसला. यावेळी तिने मदतीसाठी आरडा ओरड केली. तिचा आवाज ऐकताच बंडू हे तिला वाचविण्यासाठी धावतच पायऱ्यावर आले. त्यांनी कपड्याच्या सहाय्याने तिला ओढून काढले. त्यानंतर तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार बापुराव बाभळे, बालाजी जोगदंड यांच्या पथकाने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात जाऊन चौकशी केली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत कुरुंदा पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. दरम्यान, मयत परिदी ही इयत्ता चौथी वर्गात शिक्षण घेत होती. अभ्यासात अतिशय हुशार असलेली परिदी शिक्षकांची लाडकी विद्यार्थीनी होती. तिच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. दुपारच्या वेळी मृतदेहावर पार्डी खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तिच्या पश्‍चात आई, वडिल, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment