वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदान:चंद्रभान पुनमचंद भन्साळींनी नोंदवला लोकशाहीच्या उत्सवात सहभाग

वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदान:चंद्रभान पुनमचंद भन्साळींनी नोंदवला लोकशाहीच्या उत्सवात सहभाग

पर्वती मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक आणि उद्योगपती चंद्रभान पुनमचंद भन्साळी यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी गृहमतदानाद्वारे हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. भन्साळी यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि लोकशाहीबद्दलची दृढ निष्ठा यावेळी पहावयास मिळाली. प्रत्येकाने मतदान करून आपली लोकशाही बळकट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वती मतदारसंघात गृह मतदान प्रक्रिया सूरू करण्यात आली आहे. फॉर्म १२ डी भरून गृह मतदानासाठी नोंदणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भन्साळी यांचे गृह मतदान करून घेण्यासाठी हे पथक त्यांच्या घरी पोहोचले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकटेश दुर्वास, नायब तहसीलदार सरिता पाटील पथकासोबत भन्साळी यांच्या उपस्थितीत गृहमतदानाची प्रक्रिया पार पडली. गृहनिर्माण संस्थांमध्ये जनजागृती स्वीप टीममार्फत सलग तीन दिवस सुट्टीमुळे शासकीय-निमशासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच बहुतांश सोसायट्यांचे पदाधिकारी घरी असल्याचे लक्षात घेऊन सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये संकल्प पत्राचे वाटप करुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ‘लाचा लाईफ स्टाईल मॅनेजमेंट वेलनेस सेंटर-वानवडी’ येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत भेट देऊन येत्या २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार असून लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्वीप कक्षाचे समन्वयक भगवान कुरळे यांनी केले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment